काँग्रेसमध्ये जाताच भाजप नेता म्हणाला, अमित शहांसोबतची मैत्री तोडली नाही!

भाजपने सहा वर्षांसाठी निलंबित केल्यानंतर हरकसिंह रावत यांनी शुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
Harak Singh Rawat
Harak Singh Rawat Sarkarnama
Published on
Updated on

डेहराडून : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तोंडावर उत्तराखंडमधील (Uttarakhand) राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने मंत्री हरकसिंह रावत (Harak Singh Rawat) यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर त्यानी शुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर टीका करताना अमित शहांच्या मैत्रीचाही उल्लेख केला. (Uttarakhand Election 2022)

हरकसिंह रावत यांची काँग्रेसमध्ये घरवापसी झाली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसला दिलासा मिळाला आहे. माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते हरीश रावत यांनी हरकसिंह यांनी माफी मागितल्यास त्यांना पक्षात परत घेण्यात येईल, अशी भूमिका घेतली होती. यानंतर हरकसिंह यांनी रावत यांची शंभर वेळा माफी मागत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे त्यांचा काँग्रेसमधील प्रवेश निश्चित मानला जात होता.

Harak Singh Rawat
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? प्रियांका गांधींनी गुगली टाकत दिले मोठे संकेत

अखेर शुक्रवारी हरकसिंह यांनी हरीश रावत यांच्या उपस्थितीतच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना हरकसिंह रावत म्हणाले, दहा मार्च रोजी राज्यात काँग्रेस बहुमत मिळवेल, ती माझी खरी माफी असेल. भाजपने माझा वापरा आणि फेकून द्या, एवढ्यासाठी विचार केला. त्यामुळे मी खूप नाराज होतो. मी वचन दिल्याप्रमाणे अखेरच्या क्षणापर्यंत मी माझी गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यासोबतची मैत्री तोडली नाही, असंही रावत यांनी सांगितले. (Uttarakhand Election Update)

दरम्यान, हरकसिंह रावत यांनी 2016 मध्ये दहा आमदारांसह काँग्रेस (Congress) सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री हरीश रावत यांच्याविरोधात त्यांनी बंड केले होते. भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी दोनदा मुख्यमंत्री पदासाठी इच्छा व्यक्त केली होती. पण दोन्हीवेळा त्यांना संधी मिळाली नाही. तेव्हापासून ते पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात होते.

आगामी विधानसभा निवणुकीसाठी रावत यांनी आपल्यासह कुटुंबातील तिघांना पक्षाकडे तिकीट मागितले होते. पण पक्षाकडून त्यांना नकार देण्यात आला. त्यामुळे रावत नाराज झाले होते. तसेच त्यांच्या काँग्रेससोबतही चर्चा सुरू असल्याचे संकेत मिळत होते. त्यानंतर ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीत दाखल झाले होते. पण नेत्यांना भेटण्यापूर्वीच त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com