काँग्रेसची स्टारपॉवर वाढली; पक्षाला मिळाला आणखी एक सिद्धू!

पंजाबमध्ये काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या नवज्योतसिंह सिद्धू यांच्यासोबत आणखी एक सिद्धू पक्षाला मिळाला आहे.
Sidhu Moose Wala and Navjot Singh Sidhu
Sidhu Moose Wala and Navjot Singh Sidhu Sarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : पंजाबचे (Punjab) तत्कालीन मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांची काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्यामुळे विकेट पडली होती. नंतर मुख्यमंत्रिपदाची धुरा चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी हाती घेतली असली तरी पक्षाचे नेतृत्व सिद्धू करीत आहेत. आता या सिद्धूंसोबत आणखी एक सिद्धू काँग्रेसला मिळाला आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसे वाला (Sidhu Moose Wala) हा काँग्रेसमध्ये दाखल झाला असून, पक्षाची स्टारपॉवर वाढली आहे.

सिद्धू मूसे वाला हा लोकप्रिय असण्यासोबत वादग्रस्तही आहे. त्याने आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी नवज्योतसिंग सिद्धू आणि मुख्यमंत्री चन्नी यांनी त्याचे स्वागत केले. गायक सिद्धू हा 28 वर्षांचा असून, त्याच्यावर अनके गुन्हे दाखल आहेत. गाण्यातून बंदुकीचा वापर आणि हिंसाचाराला खतपाणी घातल्याबद्दल त्याच्यावर हे गुन्हे दाखल आहेत. त्याचे मूळगाव मनसामध्ये असून, त्याच मतदारसंघातून तो निवडणूक लढू शकतो, अशी शक्यता आहे. त्याच्या गँगस्टर रॅपचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत.

सिद्धू हा मनसातील मूसा गावातील आहे. त्याची आई गावची सरपंच आहे. त्याच्या गाण्यातून अनेक वेळा जातीपातीतील भेदभावाचे समर्थन केले जाते. त्याचे खरे नाव सिद्धूसिंग असे आहे. अभियांत्रिकी करीत असताना त्याने कॉलेजमध्ये गाणे सुरू केले. त्याने एका गाण्यात एके-47 रायफलचा वापर केला होता. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात हे गाणे व्हायरल झाले होते. याचबरोबर सिद्धूवर गुन्हाही दाखल झाला होता. तो अनेकवेळा त्याच्या गाण्यात जातीच्या अभिमानाबद्दल बोलताना दिसतो.

Sidhu Moose Wala and Navjot Singh Sidhu
सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर सरकारकडून तातडीनं चार जिल्ह्यांतील शाळा बंद

चन्नी यांच्या रुपाने काँग्रेसला पंजाबमध्ये पहिला दलित मुख्यमंत्री मिळाला आहे. मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांचा यांच्यासोबत काँग्रेस हाय कमांडने सुखजिंदरसिंग रंधावा आणि ओ.पी.सैनी यांनी हे दोन उपमुख्यमंत्री दिले आहेत. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. जातीय समीकरणे पाहून राहुल गांधींनी दोन उपमुख्यमंत्री देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने नाराज नेत्यांना खूष करण्याचा हा प्रयत्न होता.

Sidhu Moose Wala and Navjot Singh Sidhu
पोलीस नसते तर माझं 'मॉब लिंचिंग' झालं असतं! कंगनाची आपबीती

पंजाब काँग्रेसमध्ये प्रदीर्घ काळ वाद सुरू होता. अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात संघर्ष सुरू होता. यामुळे पक्ष दोन गटांत विभागला गेला. सिद्धू हे प्रदेशाध्यक्ष झाल्याने अमरिंदरसिंग यांना शह बसण्यास सुरवात झाली. यातून त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरवात झाली होती. अखेर अमरिंदरसिंग यांनी पक्ष सोडून नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com