नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यादरम्यान शनिवारी शेवटच्या दिवशी संयुक्त राष्ट्रच्या महासभेला (UNGA) संबोधित केलं. या भाषणांचं भाजपमधील अनेक नेत्यांनी कौतूक केलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांनी या भाषणावरून मोदींवर निशाणा साधला आहे.
काँग्रेसचे नेते खासदार पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांनी मोदींच्या भाषणाबाबत रविवारी एक ट्विट केलं आहे. पंतप्रधान मोदींच्या भाषणावेळी मोजक्याच खुर्च्या भरलेल्या होत्या. त्यांच्या भाषणानंतर कुणी टाळ्याही वाजवल्या नाहीत. त्यामुळे मी खूप निराश झालो होतो. संयुक्त राष्ट्रातील स्थायी सदस्यत्वाचे भारताचे मिशन गडबडले आहे, असं चिदंबरम यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी मोदींच्या भाषमावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांना टिकेचं लक्ष्य केलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत बोलताना पंतप्रधान भारताला "मदर ऑफ ऑल डेमोक्रसी" म्हणाले आहेत. मला आशा आहे की, योगीजी आणि हिमंत बिस्वा शर्मा हे ऐकत असतील, असं ट्विट सिब्बल यांनी केलं आहे.
दरम्यान, महासभेतील भाषणामध्ये पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तान आणि पंतप्रधान इम्रान खान यांचा उल्लेख टाळून दहशतवादाच्या मुद्यावरून अनेक ताशेरे ओढले. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांनी आपल्यालाही याचा तेवढाच धोका असल्याचा विचार करायला हवा. अफगाणिस्तानच्या जमिनीचा वापर दहशतवाद पसरवण्यासाठी किंवा दशहतवादी हल्ले करण्यासाठी होऊ नये, हे सुनिश्चित करायला हवं, असं पंतप्रधान म्हणाले.
आपल्या 20 मिनिटांच्या हिंदीत केलेल्या भाषणामध्ये त्यांनी पाकिस्तान व चीनचा थेट उल्लेख करण्याचं टाळलं. इम्रान खान यांनी मात्र, आपल्या भाषणात भारताचं नाव घेत टीका केली होती. भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात चीनचा उल्लेख का केला नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. इम्रान खान यांनी महासभेतील आपल्या भाषणात भारताचं नाव घेत टीका केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.