Priyanka Gandhi : राहुल गांधींचा रेकॉर्ड प्रियांका मोडणार की निवडणूक जड जाणार? CPI कडून बड्या नेत्याला उमेदवारी

CPI Nominates Senior Leader Against Priyanka Gandhi : सत्यन मोकेरी यांनी वायनाड मतदारसंघातून 2014 ची लोकसभा निवडणूक लढवली होती.
Priyanka Gandhi, Sathyan Mokeri
Priyanka Gandhi, Sathyan MokeriSarkarnama
Published on
Updated on

Kerala News : वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शुक्रवारपासून सुरूवात झाली. काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका गांधी यांच्याविरोधात कम्युनिस्ट पक्षाने ज्येष्ठ नेते सत्यन मोकेरी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीत प्रियांका गांधी या राहुल गांधींचा मताधिक्याचा रेकॉर्ड मोडणार की त्यांना निवडणूक जड जाणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

सीपीआयकडून सत्यन मोकेरी यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी राहुल यांच्या इंदिरा गांधींच्या पराभवाची आठवण करून दिली. त्यामुळे वायनाडमध्ये सीपीआयकडून प्रियांका यांच्याविरोधात ताकदीने निवडणूक लढवली जाणार, हे स्पष्ट झाले आहे.

Priyanka Gandhi, Sathyan Mokeri
Sheikh Hasina : शेख हसीना यांना कोर्टाचा मोठा दणका; आता मोदी सरकार काय करणार?

कोण आहेत सत्यन मोकेरी?

सत्यन मोकेरी हे सीपीआयचे केरळमध्ये ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक वायनाड मतदारसंघातून लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा केवळ 20 हजार मतांच्या फरकाने पराभव झाला होता. तसेच ते 1987 ते 2001 या कालावधीत नादापुरम विधानसभा मतदारसंघाचे आमदारही होते. वायनाडमध्ये त्यांचा दांडगा संपर्क असून एका निवडणुकीचा अनुभवही त्यांच्या पाठिशी आहे.

प्रियांका गांधींची पहिलीच निवडणूक

प्रियांका गांधी यांची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे पक्षाने त्यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघाची निवड केली आहे. या मतदारसंघात 2024 च्या निवडणुकीत राहुल गांधी यांनी तब्बल सव्वा चार लाख मतांनी विजय मिळवला होता. पण रायबरेलीतूनही त्यांनी विजय मिळवल्याने या मतदारसंघाचा राजीनामा दिला. त्यामुळे ही निवडणूक होत आहे.

Priyanka Gandhi, Sathyan Mokeri
Haryana Assembly Election : हरियाणात 20 मतदारसंघात पुन्हा निवडणूक? याचिका पाहून सरन्यायाधीशांनाही आश्चर्य वाटलं...

राहुल यांच्या जागी पक्षाने त्यांच्या बहिणीलाच संधी दिल्यानंतर मतदारसंघातूनही त्याचे स्वागत करण्यात आले होते. मतदारसंघात काँग्रेसची संघटनात्मक बांधणी आणि गांधी कुटुंबियांविषयी असलेल्या आपुलकीचा फायदा प्रियांका गांधी यांना नक्कीच होईल. त्यांची ही पहिलीच निवडणूक असल्याने त्या स्वत: आणि पक्षाची संपूर्ण टीम झोकून देऊन प्रचार करणार, हे स्पष्टच आहे.

मोकेरी यांचाही इशारा

प्रियांका गांधी यांच्यासाठी सध्यातरी ही निवडणूक एकेरी वाटत असली तरी सीपीआयचे कार्यकर्त्यांचे जाळे आणि मोकेर यांच्या पाठिशी असलेला अनुभवही विसरून चालणार नाही. मोकेरी यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लगेच राहुल गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या पराभवाची आठवण करून दिली आहे. प्रियांकाही पराभूत होऊ शकतात, असे सांगताना त्यांनी 2014 मध्ये आपला केवळ 20 हजार मतांनी पराभव झाल्याचेही ठणकावून सांगितले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com