Jharkhand Assembly Election : चिराग पासवान यांना भाजपने दाखवली ‘जागा’; नव्या भिडूला झुकते माप

NDA vs INDIA alliance in Jharkhand elections : झारखंडमध्ये दोन टप्प्यांत विधानसभेची निवडणूक होणार असून एनडीए विरुध्द इंडिया आघाडी असा थेट सामना होणार आहे.
Chirag Paswan BJP
Chirag Paswan BJPSarkarnama
Published on
Updated on

Ranchi News : काही दिवसांपूर्वी झारखंडमध्ये गेल्यानंतर केंद्रीय मंत्री व लोक जनशक्ती पक्षाचे (पासवान) अध्यक्ष चिराग पासवान यांनी स्वबळावर विधानसभा निवडणूक लढण्याबाबतचे विधान केले होते. एनडीएमध्ये अधिकाधिक जागा मिळवण्यासाठी त्यांनी शक्तीप्रदर्शनही केले होते. पण भाजपने जागावाटपात त्यांची ‘जागा’ दाखवून दिली आहे.    

झारखंडमधील एनडीएचे जागावाटप जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार भाजप राज्यात 81 पैकी 68 जागा लढवणार आहे. तर ऑल झारखंड स्टूडेंट्स यूनियन (आजसू पार्टी) या पक्षाची एनडीएमध्ये यावेळी एन्ट्री झाली आहे. याच पक्षाला भाजपने जागावाटपात झुकते माप देताना 10 जागा सोडल्या आहेत.

Chirag Paswan BJP
Omar Abdullah Government : काँग्रेसनं पायावर धोंडा पाडून घेतला; काश्मीरमध्ये होणार बंगालची पुनरावृत्ती ?  

केंद्रात मंत्री असलेल्या चिराग यांचा पक्ष झारखंडमध्ये एनडीएतून निवडणुकीला सामोरे जाणार असला तरी त्यांची केवळ एका जागेवर बोळवण करण्यात आली आहे. त्यांना चतरा मतदारसंघ सोडण्यात आला आहे. त्यांच्या पक्षाची राज्यात फारशी ताकद नाही. पण त्यानंतर ते स्वबळाची भाषा करत होते. एनडीएतील नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलालाही केवळ दोन जागा देण्यात आल्या आहेत.

भाजपने सर्वाधिक 68 जागा आपल्या पदरात पाडून घेत मोठी खेळी खेळली आहे. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी 41 हा जादुई आकडा आहे. त्यापेक्षा 27 जागा अधिकच्या मिळवत भाजपने एकप्रकारे स्वबळावर सत्ता मिळवण्याची तयारी केल्याचेही मानले जात आहे.

Chirag Paswan BJP
Sheikh Hasina : शेख हसीना यांना कोर्टाचा मोठा दणका; आता मोदी सरकार काय करणार?

दरम्यान, इंडिया आघाडीच्या जागावाटपाची चर्चा अजूनही सुरूच आहे. आजपासून पहिल्या टप्प्यातील अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे आघाडीचे जागावाटपही एक-दोन दिवसांत अंतिम होईल. मागील दहा महिन्यांत राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत असल्याने कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com