AAP vs BJP : 'आप'मधून भाजपात गेला तरी नाही वाचला, खासदारावर दोन गंभीर गुन्हे दाखल! पोलिस पोहोचले घरी, महिलेचे शोषण अन्

MP Sandeep Pathak FIR Police : आपमधून भाजपमध्ये गेलेल्या राज्यसभेतील खासदार संदिप पाठक हे पोलिसांच्या रडावर आले आहेत. त्यांच्या विरोधात दोन गंभीर गुन्हे दाखल झाल्याची माहिती आहे.
FIR Registered Against MP Sandeep Pathak
FIR Registered Against MP Sandeep Pathaksarkarnama
Published on
Updated on

Punjab Politics : भाजपने ऑपरेशन लोटस राबवत राज्यसभेतील आम आदमी पक्षाचे (आप) सात खासदार फोडले. राघव चड्डा यांच्या नेतृत्वाखाली हे खासदार भाजपमध्ये समाविष्ट झाले. आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी यावरून खासदारांसह भाजपवर देखील टीका केली. आता पंजाब पोलिसांनी मोठी कारवाई करत भाजपमध्ये गेलेले खासदार संदीप पाठक यांच्यावर भ्रष्टाचार आणि महिलेचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केले आहे. या संदर्भात 'जागरण'ने वृत्त दिले आहे.

वृत्तामध्ये सुत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, पाठक यांच्यावर जामिन मिळण्यासाठी काही कलमे लावण्यात आली आहे. दरम्यान, गुन्हा झाल्याबाबत अजून अधिकृत माहिती पोलिस अथवा पंजाब सरकारकडून अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

संदिप पाठक यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, त्यांच्या विरोधात दाखल झालेल्या गु्न्ह्याविषयी त्यांना काहीच माहिती नाही. तसेच पोलिसांनी त्यांच्या कुठलाही संपर्क साधला नाही अथवा कुठलीही सूचना त्यांना देण्यात आलेली नाही. मी माझे संपूर्ण जीवन इमानदारीने आणि निष्ठेने देशाच्या सेवेसाठी लावले. देश कुठल्याही पक्षापेक्षा मोठा आहे. त्याच्यासोबत कधीच विश्वासघात करणार नाही.

FIR Registered Against MP Sandeep Pathak
Chief Minister news : धक्कादायक : मुख्यंमत्री मद्यप्राशन करून पोहोचले विधानसभेत? सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी व्हिडीओच दाखविला... 

दरम्यान, पाठक यांच्या अटकेसाठी पंजाब पोलिस यांच्या दिल्लीतील निवास्थानी दाखल झाली होती. मात्र, गुन्हा दाखल होण्याच्या बातमी सार्वजिनिक होण्यापूर्वीच आणि पंजाब पोलिस पोहोचल्यानंतर संदीप पाठक यांनी घराच्या मागील दारातून पळ काढल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

राजेंद्र गुप्ता यांच्या कारखान्यांवर छापा

भाजपमध्ये सहभागी झालेले उद्योगपती राजिंदर गुप्ता यांच्या कारखान्यांवर देखील पंजाब प्रदुषण नियंत्रण बोर्ड ने छापा टाकले होते. त्यांनी हायकोर्टात धाव घेत कारवाई थांबवण्याची विनंती केली होती. दरम्यान, कोर्टाने चार तारखेपर्यंत कारवाईला स्थगिती दिली आहे.

FIR Registered Against MP Sandeep Pathak
BJP leader nephew murder case : थरार! भाजप नेत्याच्या पुतण्याची दिवसाढवळ्या हत्या, पोलिसांनी काही तासांतच...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com