गुन्हा दाखल झाल्याने काँग्रेसचा विधान परिषदेचा उमेदवार अडचणीत

विधान परिषदेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असून, काँग्रेस अब्जाधीश उमेदवाराला रिंगणात उतरवले आहे.
Congress
Congress Sarkaranama
Published on
Updated on

बंगळूर : विधान परिषदेच्या (Legislative Council) निवडणुकीची धामधूम कर्नाटकात (Karnataka) सुरू आहे. बंगळूर स्थानिक स्वराज्यसंस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी काँग्रेसने (Congress) युसूफ शरीफ (Yusuf Sharif) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शरीफ हे राज्यातील सर्वांत श्रीमंत राजकारणी मानले जात आहेत. आता निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी शरीफ यांच्या विरोधात दोन तर काँग्रेस आमदार नारायण स्वामी यांच्या विरोधात एक गुन्हा दाखल केला आहे.

प्रचाराच्या भाषणात शरीफ यांनी मतदारांना प्रलोभन दाखवल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. शरीफ यांच्या विरोधात अट्टिबेले आणि येलहंका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बंगारपेटचे आमदार असलेले स्वामी यांच्या विरोधात मतदारांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे शरीफ आणि स्वामी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

शरीफ हे अब्जाधीश आहेत. ते सुरवातीला भंगार व्यावसायिक होते. त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना आता त्यांची संपत्ती जाहीर केली असून, त्यांची एकूण मालमत्ता 1 हजार 744 कोटी रुपये आहे. शरीफ हे भंगारवाले या नावाने परिचित आहेत. परंतु, उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी पक्षीय वर्तुळात त्यांच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. त्यांचे नाव जाहीर झाल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला होता.

Congress
माझ्या दहा पिढ्या बसून खातील एवढं कमावलय पण राजकारणात येऊन मी चूक केली!

शरीफ यांच्याकडे स्थावर मालमत्ता 1 हजार 643 कोटी रुपये, जंगम मालमत्ता 97.98 रुपये आणि कर्ज 67.24 कोटी रुपयांचे आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीकडे स्थावर मालमत्ता 1.30 कोटी रुपये आणि जंगम मालमत्ता 98.96 लाख रुपये आहे. त्यांच्या दुसऱ्या पत्नीकडे जंगम मालमत्ता 32.22 लाख रुपये आहे. इतर मालमत्ता त्यांच्या मुलांच्या नावावर आहे.

Congress
हेलिकॉप्टर अपघाताची भीषणता : 9 जणांचे मृतदेह अद्याप नातेवाईकांकडे दिलेच नाहीत

शरीफ हे मूळचे कोलार गोल्ड फिल्ड्स येथील आहेत. त्यांचे शिक्षण पाचवीपर्यंत झाले असून, ते सरकारी शाळेत झाले आहे. त्यांना दोन पत्नी आणि पाच मुले आहेत. त्यात एक मुलगी आणि पाच मुलांचा समावेश आहे. शरीफ यांच्याकडे 3 कोटी रुपयांच्या मोटारी आहेत. यात एक रोल्स रॉईस आणि दोन फॉर्च्युनर मोटारींचा समावेश आहे. अब्जाधीश उमेदवाराला काँग्रेसने अचानक विधान परिषदेची उमेदवारी दिल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com