Firing On Chandrashekhar Azad : 'भीम आर्मी'चे चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार

Chandrashekhar Azad News : पोटावर आणि कमरेला गोळ्या लागल्या
Chandrashekhar Azad
Chandrashekhar Azad Sarkarnama
Published on
Updated on

Death Attack On Chandrashekhar Azad : 'भीम आर्मी'चे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर उत्तर प्रदेशमधील देवबंद भागात गोळीबार झाला आहे. यात ते गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. हरियाणातील वाहनामधून आलेल्या हल्लेखोरांनी हा गोळीबार केला. यात आझाद यांच्या पोटावर आणि कमरेला गोळ्या लागल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले आहेत. आझाद यांचे देशभर कार्यकर्ते आहेत. (Latest Political News)

Chandrashekhar Azad
Ashok Chavan News : अशोक चव्हाणांच्या वक्तव्याने ठाकरे गटाची अडचण? लोकसभेच्या 'त्या' 13 जागा ठरणार कळीचा मुद्दा

उतर प्रदेशातील देवबंद येथे चंद्रशेखर आझाद आपल्या कारमधून आले होते. दरम्यान, हल्लेखोर त्यांच्या गाडीचा पाठलाग करत होते. देवबंद येथे येताच हल्लोखोरांनी त्यांच्या वाहनावर अचनाक हल्ला केला. या हल्ल्यातून आझाद थोडक्यात बचावले आहेत. गाडीच्या सीटवर आणि दरवाजावर गोळ्यांच्या खुणा आहेत. दरम्यान, हा हल्ला कुणी व का केला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

चंद्रशेखर आझाद यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत उत्तर प्रदेश प्रशासनाने दुजोरा दिला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुासर, चंद्रशेखर यांच्यावर एका कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. त्यांच्यावर अनेक गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. त्यांच्या गाडीच्या दरवाजातून एक गोळी आरपार गेली आहे. यातील एक गोळी चंद्रशेखर यांच्या कमरेला स्पर्श करून गेली. या हल्ल्यात त्यांच्या वाहनाच्या सर्व काचा फुटल्या आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com