MP Election Congress List : मध्य प्रदेशसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर; कमलनाथांसह 144 उमेदवारांची घोषणा!

MP Election Congress List : "काँग्रेसचे कमलनाथ छिंदवाडामधून उमेदवारी तर..."
MP Election Congress List
MP Election Congress ListSarkarnama
Published on
Updated on

MP Election Congress List : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 144 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ यांना छिंदवाडा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसची उमेदवारांची ही पहिली यादी जाहीर झाली आहे. (Latest Marathi News)

या यादीत काही प्रमुख्य नेत्यांचा समावेश आहे. भोपाळ मध्य मतदारसंघामधून काँग्रेसने आरिफ मसूद यांना तिकीट दिले आहे. काँग्रेसने राऊळमधून जितू पटवारी यांना उमेदवारी दिली आहे. ग्वाल्हेर ग्रामीणमधून साहिब सिंग गुर्जर यांना तिकीट देण्यात आले आहे, तर त्याचवेळी छत्तीसगड आणि तेलंगणा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. (Kamalnath News)

MP Election Congress List
Rahul Gandhi On Women Reservation : काँग्रेसच्या महिला विधेयकात OBC आरक्षण नव्हतं, याचा खेद वाटतो का ? राहुल गांधी म्हणाले...

तेलंगणासाठी 55 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. छत्तीसगडसाठी 30 उमेदवार आणि मध्य प्रदेशसाठी 144 जागांवर काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मात्र, त्याचवेळी काँग्रेसच सरकार असलेल्या राजस्थानची यादी मात्र अद्याप जाहीर करण्यात आली नाही.

MP Election Congress List
Nagpur News : पटोले, वडेट्टीवार यांच्यासमोरच काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा राडा...

विधानसभा निवडणूक कार्यक्रम -

मिझोराम - 7 नोव्हेंबर रोजी मतदान

छत्तीसगड - 7 आणि 17 नोव्हेंबर रोजी मतदान

मध्य प्रदेश - 17 नोव्हेंबर रोजी मतदान

राजस्थान - 25 नोव्हेंबर रोजी मतदान

तेलंगणा - 30 नोव्हेंबर रोजी मतदान

पाच राज्यांचा निकाल - 3 डिसेंबर रोजी

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com