Congress Politics : पाच माजी मुख्यमंत्री पुन्हा काँग्रेसमध्ये येणार? घरवापसीची होतीये चर्चा!

Amarinder Singh Ghulam Kiran Kumar Nabi Azad : माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आणखी चार मुख्यमंत्री काँग्रेसमध्ये घरवापसी इच्छुक असल्याची चर्चा सुरू झाली होती.
Rahul Gandhi Amarinder Singh Ghulam  Kiran Kumar Nabi Azad
Rahul Gandhi Amarinder Singh Ghulam Kiran Kumar Nabi Azad sarkarnama
Published on: 
Updated on: 

Congress News : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहे. प्रादेशिक पक्षांची देखील त्यांना साथ मिळत आहेत. भाजप सरकारला घेरण्याची रणनीती काँग्रेस आखत आहे. यातच आता काँग्रेस सोडून गेलेले पाच मुख्यमंत्री पुन्हा काँग्रेसमध्ये येण्यास उत्सुक असल्याची चर्चा आहे.

गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काँग्रेस सोडून गेलेल्या विविध राज्यातील मुख्यमंत्री पुन्हा काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक असल्याची राजकीय चर्चा आहे. मात्र, की केवळ चर्चा आहे की यामध्ये काही तथ्य आहे. हे स्पष्ट होऊ शकले नाही.

कॅप्टन अमरिंदर सिंह (पंजाब), गुलाम नबी आजाद (जम्मू-कश्मीर ) शंकरसिंह वाघेला (गुजरात), अशोक चव्हाण (महाराष्ट्र ), किरण कुमार रेड्डी (आंध्र प्रदेश) या पाच माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा ते पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार असल्याबाबत आहे. मात्र, यामध्ये अधिकृत भूमिका कोणीही जाहीर केली नाही.

Rahul Gandhi Amarinder Singh Ghulam  Kiran Kumar Nabi Azad
Raj Thackeray: देशात राजकीय भूकंप होणार? राहुल गांधी, संजय राऊतांनंतर आता राज ठाकरेही म्हणाले, "पुढच्या पाच महिन्यात..."

अशोक चव्हाण भाजपमध्येच

अशोक चव्हाण यांच्या नावाची चर्चा असली तरी ते भाजप सोडणार नसल्याचे स्पष्ट आहे. 2024 मध्ये ते आमदारकीचा राजीनामा देत भाजपकडून राज्यसभेवर गेले होते. त्यांच्या मुलगी ही भाजपची आमदार आहे. त्यामुळे अशोक चव्हाण हे भाजपसोडून काँग्रेसमध्ये जातील यामध्ये तथ्य नसल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.

राजकीय अस्तित्वाचा प्रश्न

काँग्रेससोडून गेलेल्या माजी मुख्यमंत्र्यांमध्ये केवळ अशोक चव्हाण यांच्याकडे राजकीय पद आहे. मात्र, इतर माजी मुख्यमंत्र्यांकडे कुठलेही राजकीय मोठे पद नाही. कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी भाजप आपला सल्ला घेत नसल्याचे जाहीरपणे सांगितले होते. तसेच शंकरसिंह वाघेला यांनी जाहीरपणे काँग्रेसमध्ये परतण्याविषयी सांगितले होते. तर, अखंड आंध्रचे माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी हे भाजपमध्ये आहे. मात्र, तेथे त्यांना कोणतेही मोठे पद देण्यात आले नाही. त्यामुळे राजकीय अस्तित्वाचा विचार करता हे नेते पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

Rahul Gandhi Amarinder Singh Ghulam  Kiran Kumar Nabi Azad
Political Crime News : राजकारणात खळबळ! काँग्रेस शहराध्यक्षांना जीवे मारण्याची धमकी; आरोपीला अटक

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com