Ambadas Danve News : पुरवणी मागण्या विकासासाठी नव्हे, तर पक्षांतर केलेल्या आमदारांसाठी..

Shivsena (UBT) राज्याचा विकासाचा दर हा ९ टक्के असताना तो आता ६.५ टक्क्यांवर घसरला आहे.
Opposition Leader Ambadas Danve News
Opposition Leader Ambadas Danve NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Monsoon Session : राज्य सरकारच्या वतीने सादर करण्यात आलेल्या ४१ हजार २४३ कोटींच्या पुरवणी मागण्यांवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जोरदार टीका केली. या पुरवणी मागण्या राज्याच्या विकासासाठी नाही, तर पक्षांतर केलेल्या आमदारांना खूष करण्यासाठी राजकीय हेतूने करण्यात आल्याचा आरोप दानवे यांनी या विषयावरील चर्चेवर बोलतांना केला. (Ambadas Danve News) राज्य सरकार हे सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले असून शेतकरी, तरुण, महिला, उद्योग, कामगार अशा सगळ्याच क्षेत्रात हे सरकार पिछाडीवर असल्याचे दानवे म्हणाले.

Opposition Leader Ambadas Danve News
Sillod Nagar Parishad: सत्तारांच्या सिल्लोड नगर परिषदेचे २७ लाखांचे वीज बील थकले, महावितरणने दिली नोटीस..

आपल्या अर्ध्या तासाच्या भाषणात दानवे यांनी सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्ला चढवला. गोडबोले समितीने सुचविलेल्या शिफारशीनुसार विभागनिहाय ५ टक्के तरतूद करण्याचा प्रघात असताना या सरकारने ६.८७ टक्के तरतूद करून ही शिफारस सुद्धा पाळली नाही. (Shivsena) मोठया घोषणा करणाऱ्या या सरकारने तरतूदीही मोठ्या केल्या मात्र खर्चाचे प्रमाण अत्यल्प ठेवले. (Monsoon Seesion) आदिवासी, अनुसूचित जातीच्या विभागाच्या खर्चाची स्थितीही अतिशय कमी आहे.

राज्याचा विकासाचा दर हा ९ टक्के असताना तो आता ६.५ टक्क्यांवर घसरला आहे. शेवटच्या तिमाहीत विदेशी गुंतवणूकित महाराष्ट्र (Maharashtra) आघाडीवर असला तरी गेल्या १० वर्षात विदेशी गुंतवणुकीतला क्रमांक महाराष्ट्राने गमावला असल्याची खंत दानवे यांनी व्यक्त केली. यापूर्वी सत्तेत कोणीही असलं तरी महाराष्ट्र राज्याची प्रगती थांबली नव्हती.

मात्र या सरकारच्या काळात राज्यातील निर्यात घटली, गुंतवणूक कमी झाली, सेवा कृषी क्षेत्राची घसरण झाली. एकूणच विकासाचा दर कमी कमी होतोय. या सरकारच्या काळात प्रगतीशील महाराष्ट्राची अधोगती होत आहे. राज्य सरकारने मंजूर केलेल्या पैकी १७ टक्के पुरवण्या मागण्या या भांडवली स्वरूपाच्या असून राज्याच्या आर्थिक स्थितीकडे शासनाचे लक्ष नाही. राजकीय हेतुने या पुरवणी मागण्या मंजूर केलेल्या असल्याचा आरोपही दानवे यांनी केला.

त्याला सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी आपल्या भाषणातून प्रत्युत्तर दिले. तुम्ही विरोधी पक्षनेते आहात, त्यामुळे सरकारवर टीका करणे हे तुमचे कामच आहे. पण राज्य सरकारने केलेल्या पुरवणी मागण्या या राज्याला विकासाच्या दिशेने वेगाने नेण्यासाठी आहेत. राज्यात ट्रिपल इंजिनचे सरकार असल्यामुळे विकासाला गती मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही सरकारचे आभार मानायला पाहिजे, असा चिमटा देखील लाड यांनी दानवेंना काढला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com