Rajashan Politics: राजस्थानमध्ये मोठा राजकीय भूकंप, माजी मंत्र्यानं तडकाफडकी काँग्रेसची साथ सोडली

Congress Politics: काँग्रेसमधील अंतर्गत वाद पेटल्यामुळे विश्वेंद्र सिंह यांनी पक्ष सोडण्यापर्यंतच पाऊल उचललं आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पक्ष सोडण्यामागचं कारणही सांगितलं आहे. राजस्थानचे माजी मंत्री विश्वेंद्र सिंह यांनी अचानकपणे काँग्रेस सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Congress
Congress Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Rajasthan News: राजस्थानच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. माजी मंत्री राहिलेल्या काँग्रेसच्या बड्या नेत्यानं तडकाफडकी पक्षाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिलेल्या भरतपूरचे ज्येष्ठ नेते विश्वेंद्र सिंह यांनी काँग्रेस पक्षाची अचानक साथ सोडली आहे.

काँग्रेसमधील अंतर्गत वाद पेटल्यामुळे विश्वेंद्र सिंह यांनी पक्ष सोडण्यापर्यंतच पाऊल उचललं आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पक्ष सोडण्यामागचं कारणही सांगितलं आहे. राजस्थानचे माजी मंत्री विश्वेंद्र सिंह यांनी अचानकपणे काँग्रेस सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

माजी मंत्री विश्वेंद्र सिंह यांनी राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांच्यावर उघड-उघड टीका केल्यानंतर त्यांना पक्षातून काढून टाकण्याची तयारी सुरू होती. काही दिवसांपूर्वी महापालिका निवडणुकीतील पक्षाच्या पराभवासाठी विश्वेंद्र सिंह यांनी तिकीट वाटपाला जबाबदार धरले होते. त्यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांच्यावर आरोप करत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद डोटासरा आणि विश्वेंद्र सिंह यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती.यात संतापलेल्या डोटासरा यांनी थेट विश्वेंद्र सिंह यांच्याविरोधात अहवाल पक्षश्रेष्ठींकडे सादर केला होता.

Congress
MLC Election: शिक्षक/पदवीधर मतदारसंघांसाठी काँग्रेसचे उमेदवार जाहीर; कुठल्या विभागातून कोणाला मिळाली संधी?

तेव्हापासून त्यांना हटवण्याची मोहीम उघडली गेली होती. विश्वेंद्र सिंह यांनी महापालिका निवडणुकीतील काँग्रेस पक्षाच्या पराभवासाठी गोविंद सिंह डोटासरा यांनी केलेल्या तिकीट वाटपाला जबाबदार धरले होते. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांच्यावर आरोप केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.

माजी कॅबिनेट मंत्री विश्वेंद्र सिंह यांनी फेसबुक पोस्टद्वारे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवर जोरदार निशाणा साधला आहे. पोस्टमध्ये ते म्हणतात, स्वाभिमान अबाधित ठेवून पक्षातून बाहेर पडणे पसंत करेन, मात्र ज्या वातावरणात आपल्या तत्त्वांनुसार काम करता येत नाही, तिथे राहणे योग्य वाटत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Congress
Gokul News: महादेव जानकरांनी कोल्हापुरात येऊन राजकीय बॉम्ब टाकला, 'गोकुळच्या खासगीकरणासाठी मला 200 कोटीची ऑफर...'

तसेच सिंह यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात आपण नेहमीच पारदर्शकता जपली असून आपल्या प्रतिष्ठेला कधीही धक्का लागू दिला नसल्याचं पोस्टमध्ये नमूद केलं आहे. अशाबाबतीत त्यांच्या कुटुंबातील बुजुर्गांनीही कधीही तडजोड केली नाही, असे सांगत पक्षाच्या चुकीच्या धोरणे आणि पद्धतींचे समर्थन करत राहण्यापेक्षा पक्षाला निरोप देणेच आपल्या हिताचे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com