Gokul News: महादेव जानकरांनी कोल्हापुरात येऊन राजकीय बॉम्ब टाकला, 'गोकुळच्या खासगीकरणासाठी मला 200 कोटीची ऑफर...'

Gokul Political News: सध्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनिमित्ताने कोल्हापूरचे राजकीय वातावरण तापले आहे. त्यात माजी मंत्री महादेव जानकर यांनी कोल्हापुरात येऊन राजकीय बॉम्ब टाकला आहे. जानकरांच्या या आरोपामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
Mahadev Jankar
Mahadev JankarSarkarnama
Published on: 
Updated on: 

सुरेश साबळे

Kolhapur News: सध्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनिमित्ताने कोल्हापूरचे राजकीय वातावरण तापले आहे. त्यात माजी मंत्री महादेव जानकर यांनी कोल्हापुरात येऊन राजकीय बॉम्ब टाकला आहे. जानकरांच्या या आरोपामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. गोकुळ मल्टिस्टेट करण्यासाठी कोणते नेते जानकर यांच्याकडे गेले होते यांचं नाव घेणे हे जानकरांनी टाळले आहे. 2014 च्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात हा प्रकार झाला असल्याचंही जानकर यांनी सांगितलं आहे.

रासपचे सर्वोच्च नेते महादेव जानकर म्हणाले, मी राज्याचा दुग्धविकास मंत्री असताना काहींनी 'गोकूळ' दूध संघ मल्टीस्टेट करण्याचा घाट घातला होता. यासाठी मंत्रालयात माझ्याकडे तसा आग्रह धरला जात होता.परंतु, महाराष्ट्रातील नामांकित असलेल्या 'गोकूळ' दूध संघाचे खासगीकरण होऊ नये, तो दूध उत्पादकांच्या मालकीचा राहावा या भूमिकेशी त्यावेळी मी या खात्याचा मंत्री म्हणून ठाम राहिलो. त्यावेळी मला 200 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. मात्र, ती धुडकावून लावली असल्याचंही जानकर यांनी स्पष्ट म्हटलं आहे.

मुख्यमंत्री,पंतप्रधान यांच्या याबाबतीतील भूमिका काय आहेत हे न पाहता, प्रसंगी कोट्यवधींच्या आमिषाला मी ठोकर दिली व गोकूळ दुधसंघ सभासदांच्या मालकीचा राहण्यासाठी मी माझे कर्तव्य चोख बजावले, अशी धक्कादायक माहिती तत्कालीन दुग्धविकास मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर यांनी दिली. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने राधानगरी तालुक्यात आले असता जाहीरपणे त्यांनी हे वक्तव्य केले.

सध्या 'गोकुळ' च्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हाभर वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या या वक्तव्याला मोठे महत्व आहे. ते म्हणाले," वैयक्तिक स्वार्थासाठी मी राजकारणात आलो नसून सामाजिक सुधारणा,सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी मी सतत कार्यरत आहे. जनतेनं मला दिलेल्या प्रेमामुळे मी व माझ्या पक्षाने सत्तास्थाने काबीज केली याची मला जाणीव आहे. या जाणिवेतूनच मी राज्याचा दुग्धविकास मंत्री असताना गोकूळ दूध उत्पादकांचाच राहावा यासाठी मला मिळालेली आर्थिक आमिषे मी ठोकरली.

Mahadev Jankar
MNS News: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, राज ठाकरेंना धक्का; मनसेच्या विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांना अटक

आताच्या निवडणुकीतही मतदारांनी 'गोकूळ' दूध उत्पादकांच्या मालकीचा राहावा या भूमिकेला समर्थन देण्याची भूमिका मतदानाच्या माध्यमातून बजवावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com