

RummyCulture money laundering : ऑनलाइन गेमिंग क्षेत्रातील ‘गेम्सक्राफ्ट’ कंपनी आणि तिच्या ‘रमीकल्चर’ या लोकप्रिय ॲपविरोधात सुरू असलेल्या मनी लाँडरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) रविवारी मोठी कारवाई केली.
या तपासांतर्गत तब्बल 442 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
मनी लाँडरिंग (Money Laundering) प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) 25 सप्टेंबर रोजी या मालमत्तेवर तात्पुरती टाच आणण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. यामध्ये गेम्सक्राफ्ट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडच्या भागधारकांच्या कुटुंबीयांच्या, खासगी फॅमिली ट्रस्टच्या आणि विविध संलग्न संस्थांच्या नावे असलेल्या मुदत ठेवी, व्यावसायिक गाळे, एक आलिशान व्हिला आणि अनेक निवासी मालमत्तांचा समावेश आहे.
ईडीने (ED raid) दिलेल्या माहितीनुसार, ताज्या कारवाईतील मालमत्तेचे मूल्य 442.35 कोटी रुपये इतके आहे. यामुळे या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत जप्त व गोठवण्यात आलेल्या एकूण मालमत्तेचा आकडा 2843 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
गेम्सक्राफ्ट टेक्नॉलॉजीज आणि रमीटाइम टेक्नॉलॉजीज या दोन्ही कंपन्या रमीकल्चर, रमी प्राइम, प्लेशिप आणि रमी टाइम यांसह विविध ब्रँड्सच्या मोबाइल ॲप्सद्वारे ऑनलाइन रिअल मनी गेम्स (आरएमजी) चालवत होत्या, असे तपास यंत्रणेने स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे, ऑनलाइन रिअल मनी गेमिंगवर कायदेशीर बंदी असलेल्या तेलंगण, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांमध्येही या ॲप्सचे मोठ्या संख्येने युझर्स आढळून आल्याचे ईडीने नमूद केले आहे.
या प्रकरणातील आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. संबंधित गेमिंग प्लॅटफॉर्म्सनी युझर्सच्या संमतीशिवाय त्यांच्याविरोधात ‘बॉट्स’ वापरल्याचा दावा ईडीने केला आहे. यामुळे या ॲप्सच्या कार्यपद्धतीबाबत नव्याने प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.