Priyanka Gandhi : गांधी परिवारात लवकरच वाजणार सनई-चौघडे! प्रियंका गांधींचा मुलगा रेहान अडकणार लग्नाच्या बेडीत

Priyanka Gandhi son Rehan Vadra wedding Latest update : गांधी कुटुंबात सनई-चौघड्याची चर्चा रंगू लागली आहे. प्रियंका गांधींचा मुलगा रेहान लवकरच विवाहबंधनात अडकणार?
Priyanka Gandhi son Rehan wedding Latest update
Priyanka Gandhi son Rehan wedding Latest update
Published on
Updated on

देशातील राजकारणात प्रभावी मानल्या जाणाऱ्या गांधी कुटुंबात लवकरच सनई- चौघडे वाजणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेस नेत्या आणि वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी व त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांचा मुलगा रेहान वाड्रा लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. रेहान आपली मैत्रीण अवीवा बेगसोबत साखरपुडा करणार असल्याचे सांगितले जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, रेहान आणि अवीवा यांची ओळख अनेक वर्षांपूर्वी झाली होती. सुमारे सात वर्षांपूर्वी सुरू झालेली त्यांची मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. दोघांनीही आपले नाते खाजगी ठेवणे पसंत केले होते. मात्र, आता कुटुंबीयांच्या संमतीने त्यांनी पुढील पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. साखरपुडा हा खासगी कार्यक्रमात पार पडणार असल्याचे सांगितले जाते. ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.

अवीवा बेग ही दिल्लीतील एक प्रसिद्ध फोटोग्राफर आहे. ती ‘एटेलियर 11’ या फोटोग्राफी स्टुडिओ आणि प्रोडक्शन हाऊसची सहसंस्थापक आहे. या संस्थेमार्फत देशातील अनेक नामांकित ब्रँड्स, जाहिराती आणि लघुपटांवर काम केले जाते. अवीवाने केवळ गांधी कुटुंबाशी असलेल्या नात्यामुळे नव्हे, तर आपल्या कलेमुळे स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तिची फोटो अनेक प्रतिष्ठित कला प्रदर्शनांमध्ये मांडली गेली आहेत आणि कला विश्वात तिच्या कामाचे कौतुक झाले आहे.

Priyanka Gandhi son Rehan wedding Latest update
Top 10 News : भाजपमधील नाराजीचा स्फोट : संभाजीनगरमध्ये निष्ठावंतांचा राडा; महाजनांकडून आमदार फरांदे, हिरेंना जोरदार दणका - वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

शैक्षणिक प्रवासाबद्दल बोलायचे झाल्यास, अवीवाने दिल्लीतील मॉडर्न स्कूलमधून प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर ओपी जिंदल ग्लोबल विद्यापीठातून मीडिया कम्युनिकेशन आणि जर्नालिझममध्ये पदवी मिळवली. सध्या ती एक व्यावसायिक फोटोग्राफर आणि प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. तिच्या कामात केवळ सौंदर्य नाही, तर सामाजिक प्रश्नांबद्दलची जाणीव आणि संवेदनशीलताही दिसून येते.

Priyanka Gandhi son Rehan wedding Latest update
HSRP Number : फक्त एकचं दिवस शिल्लक! 10,000 रुपयांचा दंड टाळायचा असेल, तर आजच करा 'हे' काम!

अवीवाची व्यक्तिमत्त्व अनेक पैलूंनी समृद्ध आहे. ती एकेकाळी राष्ट्रीय स्तरावर फुटबॉल खेळली आहे. तसेच, तिला निसर्गाची विशेष ओढ आहे. जंगल, डोंगर, वाळवंट अशा ठिकाणी फिरून ती अनोख्या कथा आपल्या कॅमेऱ्यात टिपते. दुसरीकडे, रेहान वाड्रा अनेकदा आपल्या आईसोबत सामाजिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसतात. आता ही जोडी आयुष्याच्या नव्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे, जिथे राजकारण आणि कला, सार्वजनिक जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक स्वप्नांचा सुंदर संगम पाहायला मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com