.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
BJP vs Congress latest update : महाराष्ट्र, राजस्थान, हिमाचल प्रदेश अशा एकामागून एक राज्यांमध्ये काँग्रेसचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुपडा साफ होताना दिसत आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभेचे दोन मतदारसंघ आणि आसाममधील लोकसभेच्या एका मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. आता पक्षाला गुजरातमध्येही पराभवाचा सामना करावा लागला आहे.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या गांधीनगरमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आहे. गांधीनगर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा सत्ता काबीज केली आहे. या महापालिकेतील ४४ जागांपैकी भाजपने तब्बल ३८ जागांवर विजय मिळविला आहे. काँग्रेसला केवळ पाच जागा मिळाल्या आहेत. तर आम आदमी पक्षाला खातेही उघडता आले नाही.
गांधीनगरमध्ये मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या तीन जागा कमी झाल्या असल्या तरी सत्ता कायम ठेवली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला तीन जागांचा फायदा झाला आहे. अमित शाह या निवडणुकीतील प्रचारापासून दूर होते. तर दुसरीकडे काँग्रेससाठी माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला यांनी प्रचार करत घरवापसीचे संकेत दिले होते.
गांधीनगरमधील वॉर्ड सहामधील मतदारांनी काँग्रेसला पसंती दिली आहे. या वॉर्डमधील पक्षाचे सर्व चार उमेदवार विजयी झाले आहेत. या वॉर्डची स्थानिक काँग्रेसची लाज वाचविल्याची चर्चा आहे. आम आदमी पक्षाला मात्र मतदारांनी पूर्णपणे नाकारल्याचे या निवडणुकीत दिसून आले आहे.
नगरपालिकेतीही विरोधकांचा पराभव
गांधीनगरप्रमाणेच थरा आणि ओखा नगरपालिकेतील भाजपने सत्ता मिळविली आहे. थरामध्ये भाजपने १९ जागांवर विजय मिळविला असून काँग्रेसला केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागेल. ओखामध्येही भाजपचे ३३ उमेदवार निवडून आले आहेत. काँग्रेसला जेमतेम तीन जागांपर्यंत मजल मारता आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.