Raj Kundra Pornography Case : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा ED च्या कचाट्यात; घरासह कार्यालयावर रेड

ED Raid Shilpa Shetty Husband Money Laundering case ED raids at actress house : राज कुंद्रा आणि त्याची कंपनी पोर्न चित्रपटच्या माध्यमातून मोठा पैसा कमावत असल्याचा दावा पोलिसांनी केला होता.
Shilpa Shetty, Raj Kundra
Shilpa Shetty, Raj Kundra Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : पोर्नोग्राफी प्रकरणात जामीनावर तुरुंगाबाहेर असलेले अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. सक्तवसुली संचालनालयाने त्यांच्याभोवतीचा फास आणखी आवळला आहे. ईडीने शुक्रवारी या प्रकरणी कुंद्रा यांच्या घरासह प्रकरणाशी संबंधिंत इतरांची घरे व कार्यालयांवर एकाचवेळी रेड टाकली. ईडीने या प्रकरणी काही दिवसांपूर्वी मनी लाँर्डिंगचा गुन्हा दाखल केला आहे.

अश्लिल चित्रपट बनविण्याच्या आरोपाखाली कुंद्राला जून 2021 मध्ये अटक करण्यात आली होती. कुंद्रा हा प्रकरणातील प्रमुख आरोपी असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी त्यावेळी केला होता. जवळपास दोन महिने तुरुंगात घालवल्यानंतर न्यायालयाने सप्टेंबर 2021 मध्ये त्यांची जामिनावर सुटका केली आहे. पण त्यानंतरी त्यांच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत.

Shilpa Shetty, Raj Kundra
Election Commission : मतांची टक्केवारी कशी वाढली, EVM मध्ये घोळ? विरोधकांच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण

काय आहे प्रकरण?

राज कुंद्रा आणि त्याची कंपनी पोर्न चित्रपटच्या माध्यमातून मोठा पैसा कमावत असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. देशातील कायद्यांचे उल्लंघन करण्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली होती. फेब्रुवारी 2021 मध्ये हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी पहिला गुन्हा दाखल केला होता. एका तरुणीने या रॅकेटबाबत पहिली तक्रार केली होती.

चित्रपट आणि ओटीटीमध्ये काम देण्याच्या बहाण्याने काही लोक मुलींना अश्लील चित्रपटांमध्ये काम करण्यास भाग पाडत असल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्यानंतर पोलिसांनी मालाड पश्चिम भागातील एका बंगल्यात छापा टाकला. अश्लील चित्रपटांच्या शुटिंगसाठी हा बंगला भाडेतत्वावर घेण्यात आला होता. या छाप्यामध्ये बॉलीवूडमधील एका अभिनेत्रीसह 11 जणांना अटक करण्यात आले होते.

Shilpa Shetty, Raj Kundra
Mahayuti Government Formation: मुख्यमंत्री शपथविधीची तारीख ठरली! नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार

पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर राज कुंद्रा आणि त्यांच्या कंपनीचे नाव समोर आले होते. पोलिसांनी काही तरुणींचे जबाब, व्हॉट्सअप चॅट, मोबाईल ऑपवरील अश्लील चित्रपट आदी माध्यमातून कुंद्रा यांच्याविरोधात ठोस पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी राज कुंद्राला अटक केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com