Goa Politics : CM सावंत, विश्वजीत राणे यांच्यातील वाद शाहांच्या दरबारी! दिल्लीच्या बैठकीत नक्की काय घडलं?

Vishwajit Rane Vs Dr. Pramod Sawant: अलीकडे राणे यांनी बेरोजगारांसंदर्भात केलेल्या विधानावरून ते चर्चेत आले होते. राज्यातील भू रूपांतर करण्यास कोणी परवानगी दिली, यावरूनही दोन्ही नेत्यांत वाद आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीत बैठक बोलावली गेल्याने विषयीच्या तर्क-वितर्वांना उधाण आले होते.
Pramod Sawant| Vishwajit Rane | Amit Shah
Pramod Sawant| Vishwajit Rane | Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Panaji News, 01 Oct : दिल्लीत सोमवारी रात्री भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत नेमके काय ठरलं, याविषयीचे गूढ अद्याप कायम आहे. या बैठकीत सहभागी झालेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी सविस्तर माहिती देण्यास नकार दिला.

त्यामुळे या बैठकीत फार मोठी चर्चा झाल्याचे अनुमान राजकीय वर्तुळातून काढले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेही या बैठकीला उपस्थित होते. अलीकडे राणे यांनी बेरोजगारांसंदर्भात केलेल्या विधानावरून ते चर्चेत आले होते.

राज्यातील भू रूपांतर करण्यास कोणी परवानगी दिली, यावरूनही दोन्ही नेत्यांत वाद आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीत (Delhi) बैठक बोलावली गेल्याने त्याविषयीच्या तर्क-वितर्वांना उधाण आले होते. पक्षश्रेष्ठी या दोन्ही नेत्यांना जाहीर वक्तव्य न करण्याबाबतची तंबी देतील, अशी अटकळही व्यक्त केली जात होती. काही जणांनी याचा संबंध मंत्रिमंडळ फेर बदलाशीही लावला होता.

Pramod Sawant| Vishwajit Rane | Amit Shah
India Vs China : चीन सीमेवरील स्थितीबाबत लष्करप्रमुखांचा मोठा दावा; म्हणाले, आम्ही सज्ज!

काही जणांच्या चर्चेची तर आमदार दिगंबर कामत यांना सभापती करून रमेश तवडकर यांना मंत्रिमंडळात सामावून घेतले जाईल, इथपर्यंतही मजल गेली होती. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी ही बैठक मंत्रिमंडळ फेरबदलाशी संबंधित नाही, असे स्पष्ट केल्यानंतर मुख्यमंत्री (CM Pramod Sawant) व आरोग्यमंत्री यांच्यातील वाद मिटवण्यासाठी ही बैठक झाली अशी चर्चा सुरू झाली आहे.

Pramod Sawant| Vishwajit Rane | Amit Shah
Amit Shah : '2029 ला महाराष्ट्रात एकट्या भाजपचं सरकार येणार'; अमित शाह नेमकं काय म्हणाले?

'भिवपाची गरज ना'

या दोन्ही नेत्यांनी बैठकीविषयी जाहीरपणे बोलणे टाळल्याने सोयीस्कर अशा राजकीय चर्चेला ऊत आला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांनी समाज माध्यमांवर 'भिवपाची गरज ना' असा प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे दिल्लीतील बैठकीत राजकीय स्पर्धेबाबतीत चर्चा झाली आहे असे दिसून येते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com