मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटेना अन् राज्यपालांनी थेट विधानसभेचं अधिवेशन बोलावलं

गोव्यात भाजपने पुन्हा सत्ता ताब्यात राखण्यात यश मिळवले असले तरी मुख्यमंत्रिपदाचा तिढा पक्षासमोर निर्माण झाला आहे.
BJP
BJPSarkarnama

पणजी : गोव्यात भाजपने पुन्हा सत्ता ताब्यात राखण्यात यश मिळवले आहे. असे असले तरी मुख्यमंत्रिपदाचा तिढा पक्षासमोर निर्माण झाला आहे. यामुळे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी राज्यपालांना भेटून राजीनामा दिला आहे. यानंतर भाजप नेते विश्वजित राणे यांनीही थेट राज्यपालांची भेट घेतली होती. यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले असताना आता राज्यपालांनी थेट विधानसभा अधिवेेशन बोलावले आहे. या अधिवेशनासाठी हंगामी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे.

गोव्यात मुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स कायम असताना राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्ले यांनी उद्या (ता.15) विधानसभेचे अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून आमदार गणेश गावकर यांची निवड केली आहे. या अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली जाणार आहे. मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटत नसल्याने आधी आमदारांना शपथ देण्याचा निर्णय भाजप नेतृत्वाने घेतला आहे. पक्ष नेतृत्वाकडून मुख्यमंत्रिपदाच्या नावावर खल सुरू आहे. मात्र, अद्याप निर्णय होत नसल्याने आमदारांच्या शपथविधीचा निर्णय घेण्यात आला आहे.

गोव्यात (Goa) विधानसभेच्या ४० पैकी २० जागा भाजपला (BJP) मिळाल्या आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि तीन अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. यामुळे भाजपने गोव्यात बहुमताचा आकडा गाठला आहे. असे असताना मुख्यमंत्रिपदावरून गटबाजी उफाळली आहे. विश्वजित राणे (Vishwajit Rane) हे आरोग्यमंत्री होते. राणे यांच्यासोबत त्यांच्या पत्नीही विधानसभा निवडणुकीत निवडून आल्या आहेत. सावंत यांनी आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला होता. यानंतर काही वेळाने राणे हे थेट राज्यपालांना जाऊन भेटले होते. ही भेट व्यक्तिगत स्वरूपाची असल्याचे त्यांनी म्हटले होते. दरम्यान, या भेटीबद्दल भाजप नेत्यांना काहीही माहिती नव्हती.

BJP
विधानसभा निवडणुकीतील यशानंतर लगेचच मोदी सरकारचं जनतेला 'रिटर्न गिफ्ट'

राणे हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदावर मानले जात आहेत. आजच्या त्यांच्या राज्यपालांच्या भेटीने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यामुळे गोव्यातील राजकारणात अनपेक्षित गोष्टी घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांना बदलण्याच्या चर्चेमागे त्यांचा निसटता विजयही कारणीभूत आहे. साखळी मतदारसंघातून सावंत यांचा केवळ ६६६ मतांनी विजय झाला आहे. सावंत यांच्या खराब कामगिरीमुळे पक्षांतर्गत विरोधकांनी त्यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. त्यामुळे सावंतांची विकेट पडून मुख्यमंत्रिपदासाठी दुसरे नाव पुढे केले जाण्याची शक्यता आहे.

BJP
कोरोनाची चौथी लाट? चीनमध्ये प्रमुख शहरांत पुन्हा कडक लॉकडाऊन

राणेंचे सूचक वक्तव्य

भाजप नेते आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची नाराजी निकालानंतर समोर आली होती. त्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी प्रमोद सावंत यांना थेट पाठिंबा देण्याविषयीच्या प्रश्नावर बोलणं टाळलं होतं. राणे यांना गोव्याचा पुढील मुख्यमंत्री कोण असणार हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले होते की, हा संवेदनशील प्रश्न आहे. त्यामुळे मी आत्ता काहीही बोलणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com