वडिलांच्या विरोधात लढणार का? यावर राणेंचे पुत्र म्हणाले, हा आमच्या घरचा प्रश्न!

राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ करणारी घोषणा माजी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
Vishwajit Rane and Pratap Singh Rane

Vishwajit Rane and Pratap Singh Rane

Sarkarnama

Published on
Updated on

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly Election) धामधूम सुरू आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आता गोव्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ करणारी घोषणा काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे (Pratap Singh Rane) यांनी केली आहे. त्यांनी आपलेच पुत्र भाजप (BJP) नेते व आरोग्यमंत्री डॉ. विश्वजित राणे (Vishwajit Rane) यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. यावर डॉ. विश्वजित राणे यांनी उत्तर दिले आहे.

गोव्याच्या राजकारणात आतापासूनच राणे पिता-पुत्राच्या या लढाईची चर्चा होऊ लागली आहे. पुत्राविरोधात निवडणूक लढण्याची घोषणा करून प्रतापसिंह राणे यांनी सगळ्यांनाच धक्का दिला आहे. ते म्हणाले की, काँग्रेसचे पदाधिकारी आणि हितचिंतकांनी मला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची विनंती केली आहे. पोरीम मतदारसंघातून मी काँग्रेसकडून निवडणूक लढावी, असा त्यांचा आग्रह होता. यामुळे मी पोरीम मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे.

यावर डॉ.विश्वजित राणे यांनी ट्विटरवर आपली भूमिका मांडली आहे. हा कुटुंबातील मुद्दा असल्याचे सांगत त्यांनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले की, प्रतापसिंह राणे हे माझे वडील आहेत. आम्ही परस्परांशी चर्चा करून यातून मार्ग काढू. मी पोरीम मतदारसंघातून लढण्याचा निर्णय आधीच घेतला आहे. असे असले तरी आम्ही कुटुंबात एकत्र बसून हा विषय सोडवू.

<div class="paragraphs"><p>Vishwajit Rane and Pratap Singh Rane</p></div>
राजकीय भूकंप : राणे पिता-पुत्रांमध्ये होणार आता थेट लढत

प्रतापसिंह राणे हे दहा वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते गोव्याचे सहा वेळा मुख्यमंत्री होते. आता त्यांनी पुत्राच्या विरोधातच निवडणूक लढण्याची घोषणा करुन राज्यात राजकीय भूकंप घडवला आहे. विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातले राजकीय वातावरण तापले आहे. यातच आता राणे-पिता पुत्रांच्या लढतीने त्यात भर पडली आहे. या लढतीकडे आतापासूनच सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com