Devotees drown in Godavari river
Devotees drown in Godavari riversarkarnama

Kundamala Bridge Collapsed : पुण्यातील इंद्रायणीनंतर गोदावरीत मोठी दुर्घटना, देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना जलसमाधी

Devotees drown in Godavari river : पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडलीय. ज्यात तब्बल 40 पर्यटक वाहून गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
Published on

Basar (Hyderabad) : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. ज्यात दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असून 6 जणांना वाचवण्यात यश आले आहे. पण या दुर्घटनेत तब्बल 40 पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात असून आकडा वाढण्याची भीती एनडीआरएफकडून व्यक्त करण्यात येत आहे. येथे सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.

पुण्यातील या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली असतानाच महराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर गोदावरी नदीत अशीच मोठी दुर्घटना घडली आहे. येथे गोदावरीत उतरलेल्या भाविकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना नांदेड आणि धर्माबाद सीमेलगत असणाऱ्या तेलंगणा राज्यातील बासर या गावात घडली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मूळ राजस्थानचे पण सध्या हैदराबादमधील चिंतल येथील हे रहिवासी होते. हे 18 जणांचे कुटुंब हैदराबादवरून बासर येथील सरस्वती मंदिरात दर्शनासाठी आणि नदीत पवित्र स्नानासाठी आले होते. पण दुर्दैवाने, दर्शनाचा प्रवास या अपघातानंतर एका दुःखद घटनेत बदलली आहे.

Devotees drown in Godavari river
Indrayani River Bridge Collapsed update : कुंडमळा पूल दुर्घटनेत 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती, मृतांचा आकडा वाढण्याची भीती, पुलाबाबत अजितदादांनी दिली महत्वाची माहिती...

देवीचं दर्शन घेण्यासाठी जाण्याच्या आधी त्यांनी बोटीनं नदीपात्रात प्रवेश केला होता. तसेच अंघोळ करण्यासाठी बोटीतून नदीपात्रात पाच जण उतरले होते. पण अलिकडे पावसामुळे गोदावरी नदीतील पाण्याची पातळी आणि प्रवाह वाढल्याने त्यांना अंदाज न आल्यानं या भाविकांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांचा समावेश आहे. मृतकांची नावे ही राकेश, विनोद, मदन, ऋतिक आणि भरत अशी असून सर्व 20 वर्षांखालील आहेत.

गोदावरी नदीत झालेल्या या घटनेनंतर आता स्थानिकांनी प्रशासनाकडे घाटावर पुरेशी सुरक्षा उपाय करण्याची मागणी केली आहे. तर या घटनेनंतर वाहतूक आणि मागासवर्गीय कल्याण मंत्री पन्नम प्रभाकर यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी, या घटनेत पाच तरुणांच्या मृत्यूची बातमी ऐकून दुःख झाल्याचे म्हटलं आहे. तसेच मृतकांच्या कुटुंबियांबद्दल मनःपूर्वक संवेदना असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

Devotees drown in Godavari river
Indrayani River Bridge Collapsed : इंद्रायणी नदीवरील कुंडमळ्यातील पूल कोसळण्याचे धक्कादायक कारण आले समोर !

मंत्री प्रभाकर यांनी, नद्या आणि सिंचन प्रकल्पांना भेट देणाऱ्या लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. तसेच जलाशय, नद्या आणि प्रकल्पांवर चेतावणी फलक लावण्याचे निर्देश देखील त्यांनी अधिकाऱ्यांना देताना सावधगिरी बाळगण्याचे आदेश दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com