नवी दिल्ली : युक्रेनमध्ये युध्द सुरु (russia ukraine war)असून तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याची केंद्र सरकारने ‘ऑपरेश गंगा’ मोहीम सुरु केली आहे. याअंतर्गत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्यावतीने पाठविण्यात आलेल्या एयर इंडियाच्या ‘एआय-1942’ या विशेष विमानाने बुखारेस्ट (रोमानिया) येथून २५० विद्यार्थी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले आहेत. देशाच्या विविध राज्यांतील विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) २७ विद्यार्थी आहेत.
युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या भारतातील विविध राज्यातील विद्यार्थ्यांना आप-आपल्या राज्यात सुखरुप पोहचता यावे यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिल्लीस्थित विविध राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयांना मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
युध्दजन्य युक्रेनमधील अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन पहिले विशेष विमान दिल्लीत दाखल झाले. महाराष्ट्रातील 27 विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे.आज येणार्या दुसर्या गटात राज्यातील आणखी 19 विद्यार्थी असतील. एयर इंडियाचे ‘एआय-1940’हे दुसरे विशेष विमान बुखारेस्ट (रोमानिया) येथून विद्यार्थ्यांना घेऊन आज दाखल होणार असून यात महाराष्ट्रातील 19 विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे.
युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुखरुप स्वगृही पोहचता यावे, यासाठी दिल्लीस्थित महाराष्ट्र सरकारच्या, महाराष्ट्र सदनाच्यावतीने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहकार्य कक्ष सुरु करण्यात आला आहे. दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार विमानाद्वारे राज्यातील त्यांच्या घरापासून नजीकच्या विमानतळापर्यंत पोहचविण्यासाठी तिकीटे काढून देण्यात येत आहे.
या कक्षाच्यामाध्यमातून आवश्यक ते मार्गदर्शन व मदत करण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांची निवासाची व भोजनाची व्यवस्था महाराष्ट्र सदनात करण्यात आली आहे. व विमानतळाहून कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सदनात ने-आण करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना उपलब्धतेनुसार विमानाद्वारे सुखरुप स्वगृही पोहचविण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.