ओमिक्रॉन विरोधातील लढ्याला बळ! कोरोनावर आणखी दोन लशी अन् गोळीही

ओमिक्रॉन (Omicron) विरोधातील लढ्याला बळ देण्यासाठी सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे.
Covid Vaccination

Covid Vaccination

Sarkarnama

Published on
Updated on

नवी दिल्ली : कोरोना (Covid-19) विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या प्रकाराने डोके वर काढले आहे. यामुळे केंद्र सरकारची चिंता वाढली आहे. ओमिक्रॉन विरोधातील लढ्याला बळ देण्यासाठी सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना विरोधातील दोन लशी (Covid Vaccine) आणि एका गोळीच्या वापरास सरकारने परवानगी दिली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज ही घोषणा केली. कोर्बेव्हॅक्स (Corbevax) आणि कोव्होव्हॅक्स (Covovax) या दोन लशींच्या वापरास सरकारने मंजुरी दिली आहे. याचबरोबर विषाणू प्रतिबंधक मॉलन्यूपायरावीर या गोळीलाही मंजुरी देण्यात आली आहे. कोर्बेव्हॅक्स ही देशात बनवलेली पहिली आरबीडी प्रोटिन सब-युनिट व्हॅक्सिन आहे. हैदराबादस्थित बायोलॉजिकल-ई या कंपनीने या लशीची निर्मित केली आहे.

ही हॅटट्रिक असून, भारतात विकसित झालेली तिसरी कोरोना लस आता उपलब्ध झाली आहे, असे मांडवीय यांनी म्हटले आहे. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोव्हिशिल्ड या दोन लशी आधी भारतात निर्मिती झालेल्या आहेत. यात आता बायोलॉजिकल-ई कंपनीच्या कोर्बेव्हॅक्स लशीचा समावेश यात झाला आहे. कोव्होव्हॅक्स या लशीची निर्मिती सिरमच करीत आहे. मॉलन्यूपायरावीर ही गोळी जास्त धोका असलेल्या प्रौढ रुग्णांना देण्यात येणार आहे.

<div class="paragraphs"><p>Covid Vaccination</p></div>
क्रिकेटपटू दिनेश मोंगियासह काँग्रेसचे तीन आमदार आता भाजपच्या पीचवर!

देशात आत 8 कोरोना लशी उपलब्ध झाल्या आहेत. आधी देशात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, झायकोव्ह-डी, स्पुटनिक व्ही, मॉडर्ना, जॉन्सन्स अँड जॉन्सन या सहा लशींचा वापर लसीकरणासाठी होत होता. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. कोव्हॅक्सिन लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या या सिंगल डोस कोरोना लशीच्या तातडीच्या वापरासही सरकारने परवानगी दिली आहे.

<div class="paragraphs"><p>Covid Vaccination</p></div>
भाजपचा दे धक्का! काँग्रेसच्या दोन आमदारांसह विरोधकांचे माजी आमदार अन् माजी खासदार फोडले

सध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. याचबरोबर दुसरा डोस घेऊन 9 महिने पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना तिसरा डोस दिला जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com