

उत्तर प्रदेश सरकारने अंड्यांवर एक्सपायरी डेट छापणे बंधनकारक करत अंड्यांच्या व्यापारावर कडक नियम लागू केले आहेत.
या नियमांमुळे अंडी दर घसरले असून व्यापारी आणि शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
याचवेळी जागतिक संघर्षामुळे आधीच संकटात असलेल्या कृषी क्षेत्रावर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे.
Government of Uttar Pradesh News : अमेरिका आणि इस्त्रायल–इराण संघर्षामुळे मध्यपूर्वेत तणाव वाढला आहे. यामुळे हवाई वाहतूक विस्कळीत झाली असून उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तसेच समुद्री वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. इराण पोर्ट देखील बंद करण्यात आला आहे. यामुळे आखाती देशात होणारी भारतीतील निर्यात थांबली असून बंदरावर केळी, कांदा, द्राक्षे आणि सुकामेव्याचे सुमारे १००० ते १७५० हून अधिक कंटेनर अडकून पडले आहेत. यामुळे निर्यातक आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ज्यामुळे देशातील व्यापारी आणि शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशातच आता अंडी साठवणूक आणि गुणवत्तेबाबत नवे नियम लागू झाले असून दरही घसरले आहेत. यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकची भर पडली आहे.
अमेरिका आणि इस्त्रायल–इराण यांच्यातील संघर्षाचा भडका उडाल्यानंतर इराणने पोर्टस बंद करण्यासह होर्मुझ सामुद्रधुनी बंद केलीय. यामुळे कच्चा तेलासह गॅसची वाहतूक बंद झाली आहे. तर भारतात आयात होणाऱ्या सुकामेवा, मसाल्याचे कंटनेर अडकून पडले आहेत. तसेच भारतातून होणारी केळी, कांदा, द्राक्षे आणि सुकामेव्याची निर्यात देखील थांबली आहेत. यामुळे देशातील व्यापारी आणि शेतकरी संकटात सापडला असून लाखोंच्या होणाऱ्या नुकसानामुळे चिंतेत आहे.
याचदरम्यान आखाती संघर्षामुळे भारतात अंड्यांचे दर कोसळले आहेत. देशात अंड्याचे पडलेले भाव आणि उत्तर प्रदेश सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. सरकारने येत्या 1 एप्रिलपासून राज्यात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक अंड्यावर 'एक्स्पायरी डेट' (कालबाह्यता तारीख) छापने अनिवार्य केले आहे.
तसेच हा महत्त्वपूर्ण निर्णय अंडी उत्पादक आणि ग्राहकांच्या हितासाठी घेतल्याचे म्हटले आहे. तसेच जे व्यापारी किंवा शेतकरी या नियमाचे पालन करणार नाहीत, त्यांच्याविरोधात कडक कारवाईचा इशारा दिला आहे. तर जे व्यापारी किंवा शेतकरी या नियमाचे उल्लंघन करतील त्यांच्याकडील अंडी एकतर नष्ट केली जातील किंवा त्या अंड्यांवर 'खाण्यासाठी योग्य नाही' असा शिक्का मारला जाईल असाही इशारा सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने दिला आहे.
विभागाने स्पष्टीकरण देताना अंडी किती काळ खाण्यायोग्य राहतात यावर भाष्य केलं असून घातल्यापासून दोन आठवड्यांपर्यंत सुरक्षित असतात तर ती 30 अंश डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवली सुरक्षित राहतात. तीच जर 2 ते 8 अंश डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवल्यास ती पाच आठवड्यांपर्यंत चांगली राहू शकतात असेही म्हटले आहे.
देशांतर्गंत मागणी कमी झाल्याने अंड्यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. प्रति अंड्याचा दर ७ ते ६ रुपयांवरून थेट ४ ते ५ रुपयांपर्यंत खाली आला आहे. तर कर्नाटकातील बंगळूर सारख्या मोठ्या शहरात अंड्याचा घाऊक दर ५.५ रुपयांवरून ४.८ रुपयांपर्यंत खाली घसरला आहे. याचे कारण पश्चिम आशियातील संघर्ष असून निर्यात थांबल्याने पोल्ट्री व्यवसायही अडचणीत आला आहे.
'गल्फ को-ऑपरेशन कौन्सिल' (GCC) देशांना होणारी निर्यात ठप्प झाल्याने भारतातील बाजारपेठांमध्ये अंड्यांचा अतिरिक्त साठा वाढला आहे. परिणामी, पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांना वाढत्या नुकसानीला सामोरे जावे लागत असून कर्नाटकातून ओमान आणि कुवेतला मोठ्या प्रमाणात उबवण्यासाठीच्या अंड्यांची निर्यात केली जाते. ही निर्यात आता थांबली असल्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे समोर आले आहे.
1. उत्तर प्रदेश सरकारने कोणते नवे नियम लागू केले आहेत?
प्रत्येक अंड्यावर एक्सपायरी डेट छापणे बंधनकारक केले आहे.
2. या नियमांचा अंडी बाजारावर काय परिणाम झाला?
अंडी दर घसरले असून बाजारात मोठा बदल झाला आहे.
3. शेतकरी आणि व्यापाऱ्यांना याचा कसा फटका बसला?
दर कमी झाल्याने उत्पन्न घटले आणि आर्थिक नुकसान वाढले आहे.
4. जुनी अंडी विक्रीवर काय परिणाम झाला?
नवीन नियमांमुळे जुनी अंडी ताजी म्हणून विकणे शक्य राहिले नाही.
5. जागतिक परिस्थितीचा यावर काय परिणाम आहे?
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षामुळे आधीच व्यापार आणि कृषी क्षेत्रावर ताण वाढला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.