Ram Rahim Parole : दिल्ली निवडणुकीपूर्वी राम रहिमची तुरूंगातून सुटका, पहिल्यांदाच 'त्या' आश्रमात जाण्याचीही परवानगी

Ram Rahim Released Before Delhi Elections : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख आणि बलात्कार प्रकरणी तुरूंगात असलेला आरोपी गुरमीत राम रहीम दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी तुरुंगातून बाहेर येणार आहे. 30 दिवसांचा पॅरोल मिळाल्यामुळे तो मंगळवारी (ता.28 जानेवारी) हरियाणातील रोहतकच्या सुनारिया तुरुंगातून बाहेर येणार आहे.
Ram Rahim
Ram Rahim Sarkarnama
Published on
Updated on

New Delhi News, 28 Jan : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख आणि बलात्कार प्रकरणी तुरूंगात असलेला आरोपी गुरमीत राम रहीम दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी (Delhi Assembly Elections) तुरुंगातून बाहेर येणार आहे. 30 दिवसांचा पॅरोल मिळाल्यामुळे तो मंगळवारी (ता.28 जानेवारी) हरियाणातील रोहतकच्या सुनारिया तुरुंगातून बाहेर येणार आहे.

2017 मध्ये बलात्कार प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर तुरूंगात असलेल्या राम रहीमला (Gurmeet Ram Rahim) सिरसा येथील आश्रमात जाण्याची पहिल्यांदाच परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी पॅरोल किंवा फर्लोवर तुरूंगातून बाहेर आल्यानंतरही त्याला सिरसा येथील आश्रमात राहण्याची परवानगी मिळाली नव्हती.

पोलिस (Police) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राम रहीमला मंगळवारी सकाळी तुरूंगातून सोडण्यात येणार आहे. तर तुरूंगातून बाहेर येताच पहिल्यादिवसापासून तो सिरसा येथील आश्रमात राहणार आहे. तर उरलेले 20 दिवस तो बागपत येथे राहणार आहे.

Ram Rahim
Guillain Barre Syndrome : पुण्यात GBS रुग्णसंख्येची शंभरी पार, पहिला बळी गेल्यावर केंद्र सरकारने उचललं मोठं पाऊल

बलात्काराच्या शिक्षेत जेलमध्ये

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख असलेला गुरमीत राम रहीम सध्या रोहतकच्या सुनारिया तुरूंगात ऑगस्ट 2017 पासून शिक्षा भोगत आहे. 25 ऑगस्ट 2017 रोजी पंचकुला येथील विशेष सीबीआय न्यायालयाने त्याला साध्वीवर बलात्कार केल्या प्रकरणी दोषी ठरवत 20 वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र, त्याला दोषी ठरवताच हरियाणा आणि पंजाबमध्ये झालेल्या हिंसाचारात 40 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.

Ram Rahim
Baba Siddiqui Murder Case : हत्येच्या दिवशीच बाबा सिद्दीकींनी डायरीत लिहिलं भाजपच्या बड्या नेत्याचं नाव, झिशान यांचा खळबळजनक दावा

निवडणुकीपूर्वी जेलमधून सुटका

आश्चर्याची बाब म्हणजे दिल्ली (Delhi) विधानसभा निवडणुकीच्या आठ दिवस आधी राम रहीमची तुरूंगातून सुटका करण्यात आली आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्येही हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तीन दिवस आधी त्याला 20 दिवसांसाठी पॅरोल मंजूर करण्यात आला होता. तर जानेवारीत लोकसभा निवडणुकीपूर्वी 50 दिवस, तर हरियाणा पंचायत निवडणुकीपूर्वी त्याला 30 दिवसांचा पॅरोलही मिळाला होता. 2020 पासून त्याची 12 वेळा तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com