Srinagar terror operation : मोठी बातमी : संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू असतानाच 3 दहशतवाद्यांना कंठस्नान

Three Terrorists Killed in Harwan Anti-Terror Operation : पहलगाम हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. पर्यटकांना धर्म विचारून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
Security forces conduct a successful anti-terror operation in Harwan, Srinagar, eliminating three terrorists suspected of possible links to the Pahalgam attack.
Security forces conduct a successful anti-terror operation in Harwan, Srinagar, eliminating three terrorists suspected of possible links to the Pahalgam attack. sarkarnama
Published on
Updated on

Pahalgam terror link : पहलगाम दहशतवादी हल्ला करणारे दहशतवादी अद्यापपर्यंत लष्कराच्या हाती लागले नसल्याचे केंद्र सरकारकडूनही कबुल केले जात होते. पण सोमवारी संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चेला सुरूवात असतानाच लष्कराला मोठं यश मिळाले आहे. श्रीनगरमध्ये आज लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली असून त्यात तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे.

लष्कराने यमसदनी पाठवलेले तीन दहशतवाद्यांचे पहलगाम हल्ल्याशी कनेक्शन असू शकते, असे वृत्त आहे. लष्कराच्या ‘ऑपरेशन महादेव’अंतर्गत हे यश मिळाले आहे. श्रीनगर जिल्ह्यातील लिदवास जंगलांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.

लष्कर ए तोयबाचा टॉपचा कमांडर सुलेमान शाह उर्फ मुसा फौजी याने पहलगामचे षडयंत्र रचले होते. हाही या चकमकीत मारला गेला आहे. तसेच यासिर आणि हामजा हा दोघांचाही खात्मा करण्यात आला आहे. या तिघांपैकी मुसा आणि यासिर हा दोघांचा पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभाग असल्याचे धागेदोरे हाती लागल्याचे वृत्त आहे.

काही दिवसांपूर्वी एनआयएने दोन जणांना अटक केली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे ऑपरेशन राबविण्यात आले. लष्कराकडून अद्याप याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता.

Security forces conduct a successful anti-terror operation in Harwan, Srinagar, eliminating three terrorists suspected of possible links to the Pahalgam attack.
Bihar SIR : संसदेत जोरदार हंगामा, पण त्याआधीच निवडणूक आयोगाचा विरोधकांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’

हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. पर्यटकांना धर्म विचारून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. मृत्यू झालेल्यांमध्ये बहुतेक जण हिंदू होते. सुरूवातीला या हल्ल्याची जबाबदारी द रेझिस्टंस फ्रंट या संघटनेने घेतली होती. पण नंतर या संघटनेने हल्ला केला नसल्याचे सांगितले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com