Assembly Election 2024 : प्रचार उरकून भाजपचे स्टार प्रचारक थेट राहुल गांधींच्या सभेत; काँग्रेसमध्ये केला प्रवेश

Haryana BJP Congress Ashok Tanwar Rahul Gandhi : अशोक तंवर यांनी भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. 
Ashok Tanwar joins Congress
Ashok Tanwar joins CongressSarkarnama
Published on
Updated on

Chandigarh News : ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपला हरियाणात मोठा झटका बसला आहे. गुरूवारी सकाळपर्यंत भाजपचा प्रचार करणाऱ्या नेत्याने दुपारी सर्वांनाच धक्का देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या प्रचारसभेत हा पक्षप्रवेश झाला.

माजी खासदार अशोक तंवर यांची गुरूवारी दुपारी काँग्रेसमध्ये घरवापसी झाली. लोकसभा निवडणुकीआधीच त्यांनी आम आदमी पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना हरियाणातील सिरसा मतदारसंघातून भाजपने तिकीटही दिले. पण काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा यांनी त्यांचा दारूण पराभव केला.

Ashok Tanwar joins Congress
Malkhan Singh : हवाई दलातील जवानाचा मृतदेह सापडला 56 वर्षांनी; वाट पाहता-पाहता पत्नी-मुलाचे निधन, नातवाकडून अंत्यसंस्कार

लोकसभेच्या निकालानंतर चार महिन्यांतच तंवर यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. तंवर हे माजी खासदार असून काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. पण 2019 च्या निवणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी वर्षभरापूर्वीच आपमध्ये प्रवेश केला होता.

राहुल गांधी यांनी महिंदरगड येथे दुपारी सभा झाली. या सभेत तंवर थेट काँग्रेसच्या व्यासपीठावर आले. तंवर हे गुरुवारी सकाळपर्यंत भाजपच्या प्रचारात व्यस्त होते. त्यांनी सोशल मीडियातही भाजपचा प्रचार सुरू ठेवला होता. ते भाजपचे स्टार प्रचारक होते. भाजपने त्यांना प्रचार समितीचे सदस्यही केले होते.

Ashok Tanwar joins Congress
Mohammad Azharuddin : मोहम्मद अझरुद्दीन यांची ‘क्रिकेट’मुळे पडणार विकेट; ED ‘तो’ घोटाळा काढणार बाहेर

हरियाणा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही तंवर यांनी काही काळ काम केले आहे. त्यांनी 2019 मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांनी 2022 मध्ये आपमध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीसाठी आपने त्यांना निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्षपद दिले होते. पण जानेवारी महिन्यात त्यांनी आपलाही रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com