Haryana News : हरियाणातील इंडियन नॅशनल लोक दल (INLD)चे प्रदेशाध्यक्ष आणि बहादूरगडचे माजी आमदार नफे सिंग राठी हत्याकांड (Nafe Singh Rathi Murder) प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या हत्येमध्ये भाजपच्या माजी आमदाराचा हात असल्याचे समोर आले असून, त्यांच्यासह बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राठी यांच्या हत्येनंतर हरियाणाच्या राजकारणात (Haryana Politics) मोठी खळबळ उडाली आहे. त्यांना काही दिवसांपासून जिवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. रविवारी राठी यांच्या वाहनावर अज्ञातांकडून बेछूट गोळीबार करण्यात आला. यामध्ये राठी यांच्यासोबत असलेला एक जण गंभीर जखमी झाला. दोघांचाही मृत्यू झाला आहे.
राज्य सरकारने या हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे (CBI) देण्याचे जाहीर केले आहे. हरियाणा पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत बारा जणांवर गुन्हा दाखल केला असून, त्यामध्ये भाजपचे माजी आमदार नरेश कौशिक (BJP EX MLA Naresh Kaushik) यांचाही समावेश आहे. आरोपींमध्ये त्यांचे नाव आल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कौशिक यांच्यासह बहादूरगढ नगरपरिषदेच्या अध्यक्ष सरोज राठी यांचे पती रमेश राठी, त्यांचे नातेवाईक कर्मवीर राठी, कमल राठी आणि माजी मंत्री मांगे राम यांचे पुत्र सतीश नंबरदार, नातू राहुल यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींमध्ये पाच अज्ञातांचा समावेश आहे. त्यानंतरही कौशिक यांच्याच नावाची चर्चा अधिक आहे.
दरम्यान, राठी यांचा भाचा व घटनेच्यावेळी कार चालवत असलेल्या राकेशने आपबीती सांगितली आहे. त्याच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार राठी हे कारमधील पुढील सीटवर बसले होते. मागील सीटवर त्यांचे दोन सुरक्षारक्षक होते. एक कार आपला पाठलाग करत असल्याचे लक्षात आल्यानंतर राकेशनेही गाडीचा वेग वाढवला होता, पण पुढे रेल्वे क्रॉसिंग असल्याने गाडी थांबवावी लागली. याचवेळी मागील गाडीतून आलेल्या हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. हल्लेखोरांनी कौशिक यांच्यासह सतीश व कर्मवीर राठी यांचे नाव घेतल्याचा दावा राकेश यांनी तक्रारीत केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.