Jharkhand Election : झारखंडमधील हायव्होल्टेज ड्रामा; या कुटुंबातील दोन सुना आमदारकीसाठी झुंजणार

Political News : बलियाच्या बैरिया भागातील सिंह कुटूंबातील दोन सुना धनबाद जिल्ह्यातील झरिया विधानसभा मतदारसंघातून नशीब अजमावत आहेत.
Pornima Singh, Ragini Singh
Pornima Singh, Ragini Singh Sarkarnama
Published on
Updated on

Election News : झारखंड विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती पाहावयास मिळत आहेत. काही ठिकाणी नातलग समोरासमोर आल्याने या ठिकाणाची लढत रोमहर्षक होणार आहे. बलियाच्या बैरिया भागातील सिंह कुटूंबातील दोन सुना धनबाद जिल्ह्यातील झरिया विधानसभा मतदारसंघातून नशीब अजमावत आहेत. दोन्ही उमेदवार गोनिहया छपरा गावातील एकाच कुटुंबातील असल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपच्या (BJp) उमेदवार रागिणी सिंह या झरियाचे माजी आमदार सूर्यदेव सिंह यांचा मुलगा आणि माजी आमदार संजीव सिंह यांच्या पत्नी आहेत. तर बैरियाचे माजी आमदार विक्रम सिंह यांचे लहान भाऊ राजन सिंह यांचा मुलगा दिवंगत नीरज सिंह यांच्या पूर्णिमा सिंह या पत्नी आहेत. पूर्णिमा सिंह या सध्या झरिया येथील काँग्रेसच्या (Congress) आमदार आहेत. (Jharkhand Election News)

दिवंगत नीरज सिंह यांच्या हत्येनंतर त्यांचे कुटुंबीय आणि संजीव सिंह यांचे कुटुंब समोरासमोर आले आहे. संजीव सिंह सध्या एका खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात आहेत. गेल्या निवडणुकीत रागिणी सिंह यांनी संजीव सिंह यांचा पराभव करून झरियाची जागा काबीज केली होती.

आता या वेळी पुन्हा एकदा सिंह कुटुंबातील रागिणी सिंह आणि पूर्णिमा सिंह यांनी झरिया विधानसभेची जागा प्रतिष्ठेची केली आहे. सिंह कुटुंबाबतील दोन सुना निवडणुकीत समोरासमोर आल्याने बैरिया परिसरात जोरदार राजकीय चर्चा सुरू आहे.

Pornima Singh, Ragini Singh
Uddhav Thackeray : वर्षा बंगला सोडू नका म्हणणारा दुसऱ्या दिवशीच गेला तिकडे नाचायला; साथ सोडून गेलेल्या आमदारावर ठाकरेंची टीका

गोनिहया छपरा गावातील देववंश सिंह, सूर्यदेव सिंह, विक्रम सिंह, बच्चा सिंह, राजन सिंह आणि रामधीर सिंह या सहा सख्ख्या भावांनी राजकीय बालेकिल्ला मजबूत ठेवला आहे. विक्रम सिंह आणि रामधीर सिंह वगळता चार भावांचे निधन झाले आहे.

सूर्यदेव सिंह वयाच्या चौदाव्या वर्षी बिहारला गेले होते. ते धनबादमधून सलग सात वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. रामधीर सिंह हे बलिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले आहेत, तर त्यांची पत्नी इंदू देवी धनबादच्या महापौर आहेत.

Pornima Singh, Ragini Singh
Dhananjay Mahadik: भाजप खासदारानं 'लाडक्या बहिणीं'नाच भरला दम; 'जी बहीण काँग्रेसच्या सभेत अन् रॅलीत दिसेल...'

माजी आमदार सूर्य देव यांच्यानंतर त्यांच्या पत्नी कुंती सिंह या झरिया विधानसभेच्या आमदार होत्या. त्यानंतर त्यांचे पुत्र संजीव सिंह आमदार राहिले. राजन सिंह यांचा मुलगा नीरज सिंहच्या हत्येनंतर दोन भावांची कुटुंबे समोरासमोर आली आहेत. नीरज सिंहच्या हत्येप्रकरणात नाव आल्यानंतर ते सध्या तुरुंगात आहेत तर त्यांच्या पत्नी पूर्णिमा सिंह आता निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.

Pornima Singh, Ragini Singh
Sushma Andhare : अमित शहांकडून सल्ले घ्यावेत इतके वाईट दिवस ठाकरे कुटुंबावर आले नाहीत; सुषमा अंधारेंची टीका

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com