Sushma Andhare : अमित शहांकडून सल्ले घ्यावेत इतके वाईट दिवस ठाकरे कुटुंबावर आले नाहीत; सुषमा अंधारेंची टीका

Political News : हाराष्ट्रात आल्यावर अमित शहा यांच्या भाषणाची सुरुवात, मध्य आणि शेवट उद्धव ठाकरे यांच्या नावाने होतो. मोठं आव्हान त्यांना उद्धव ठाकरे वाटतात. ही आमच्यासाठी सकारात्मक गोष्ट असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केली.
Sushma Andhare
Sushma AndhareSarkarnama
Published on
Updated on

Karad News : 'अमित शहा इतना झूठ बोलकर आपको नींद कैसे आती है', ज्यांनी 70 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केलाय त्यांना चक्की पिसायला पाठवू असे म्हणाले होतात. त्यांनाच आपण जवळ घेऊन बसला आहात. जेवढ्या जेवढ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांना त्याना जवळ घेतले आहे. तरीही आनंद या गोष्टीचा आहे की, महाराष्ट्रात आल्यावर अमित शहा यांच्या भाषणाची सुरुवात, मध्य आणि शेवट उद्धव ठाकरे यांच्या नावाने होतो. मोठं आव्हान त्यांना उद्धव ठाकरे वाटतात. ही आमच्यासाठी सकारात्मक गोष्ट असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केली.

कराड येथे प्रसार माध्यमाशी बोलताना सुषमा अंधारे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व महायुती सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. आम्ही काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं याचे सल्ले अमित शहा यांच्याकडून घ्यावे, इतके वाईट दिवस ठाकरे कुटुंब आणि मातोश्रीवर आले नाहीत. ठाकरे बाणा महाराष्ट्रला माहित आहे. छत्रपती शिवरायांच्या पायाशी एकनाथ शिंदे यांनी खोटी शपथ घेतली, यावर अमित शहा यांच काय म्हणने आहे, ते त्यांनी सांगावे, असेही अंधारे म्हणाल्या. (Sushma Andhare News)

शरद पवार (Sharad Pawar) राज्याचे मुख्यमंत्री होते, तेव्हा भूकंपासारखी स्थिती होती, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोरोनासारखी स्थिती हाताळली. केंद्रीय संरक्षण मंत्री असताना, कृषी मंत्री असताना त्यांनी काय काम केले हे अमित शहा यांनी आपण आपल्या वरिष्ठ नेत्यांकडून समजून घ्यावे. शरद पवार यांच्या वाढदिवसाला भाजपचे नेते काय बोलत होते ते ऐका आणि तुमची स्क्रिप्ट वाचणाऱ्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शरद पवार यांच्याबद्दल काय म्हटलंयं हे ही ऐका, असा सवाल अंधारे यांनी केला.

Sushma Andhare
Bhokar Assembly Constituency : श्रीजया तुमची मुलगी , ती विधानसभेत तुमचे प्रश्न मांडेल..

कोणीतरी नोटीस पाठवली म्हणून घाबरणारे आम्ही नाही आहोत. गेल्या अडीच तीन वर्ष रोज असल्या केसेस आणि नोटीस याचा आम्ही सामना करत आहोत. नोटीस पाठवल म्हणून सुनील टिंगरे धुतल्या तांदळासारखे होतात का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला.

Sushma Andhare
Bhokardan-Jafrabad Constituency : आमदार संतोष दानवे यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची सदिच्छा भेट!

महायुतीचे नेते धनंजय महाडिक, देवेद्र भुयार, रवी राणा, राम कदम यांच्या डोक्यात सत्तेचा माज आहे. त्यांना असं वाटतं त्यांनी आपली बापजाद्याची दौलत विकून इथल्या माय भगिनींना दौलतअदा केली आहे. पण त्याना माहिती असावं महाराष्ट्रातील लोकांच्या टॅक्समधून हे दिले जाते, असा आरोपही यावेळी त्यांनी केला.

Sushma Andhare
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या नावासमोर मुख्यमंत्री पदाबाबत असाही 'विक्रम'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com