Congress News : काँग्रेसला मोठा धक्का; माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा मंत्रिपदाचा राजीनामा, भाजपचे 15 आमदार निलंबित

Vikramaditya Singh News : विक्रमादित्य सिंह यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेसवरील संकट अधिक गडद झाले आहे. विक्रमादित्य हे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र आहेत.
Vikramaditya Singh, Virbhadra Singh
Vikramaditya Singh, Virbhadra SinghSarkarnama
Published on
Updated on

Himachal Pradesh News : राज्यसभा निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी हिमाचल प्रदेशात मोठी उलाथपालथ झाली आहे. काँग्रेस (Congress) सरकारवरील संकट आणखी गडद झाल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या मंत्रिमंडळातील विक्रमादित्य सिंह यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे विधानसभेत भाजपचे माजी मुख्यमंत्र्यांसह चौदा आमदारांना निलंबित करण्यात आले आहे.

काँग्रेसच्या सहा आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याने भाजपचे हर्ष महाजन राज्यसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्यानंतर आज सकाळपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपच्या (BJP) शिष्टमंडळाने सकाळीच राज्यपालांची भेट घेत सरकारची बहुमत चाचणीचे आदेश देण्याची विनंती करण्यात आली. विधानसभेचे (Assembly Sesssion) कामकाज सुरू झाल्यानंतर भाजपने ही मागणी लावून धरली.

Vikramaditya Singh, Virbhadra Singh
Congress News : काँग्रेसचे भवितव्य विधानसभा अध्यक्ष अन् शिवकुमारांच्या हाती...

विधानसभेत गोंधळाची स्थिती निर्माण झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यासह भाजपचे 15 आमदार निलंबित केले. विधिमंडळात या घडामोडी घडत असताना बाहेर काँग्रेसला मोठा धक्का बसला. हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) अनेक वर्ष काँग्रेसचे तारणहार ठरलेले माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह (Vikramaditya Singh) यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले.

सिंह यांनी उघडपणे आपल्याच सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, आम्ही पक्षाला नेहमीच साथ दिली. पण मागील वर्षभरापासून सरकारचे काम निराशाजनक सुरू आहे. त्यामुळे सध्या या सरकारमध्ये थांबणे मला योग्य वाटत नाही. आमदारांच्या मागण्यांकडे कुठे ना कुठे डोळेझाक करण्यात आली आहे. त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळेच आज ही स्थिती निर्माण झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पक्षाच्या नेतृत्वाकडेही या मुद्दे मांडण्यात आले आहेत. पण त्याची योग्यप्रकारे दखल घेण्यात आली नाही. मला मंत्री असूनही अपमानित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्याप्रकारेच संदेश माझ्या विभागात पाठवण्यात आले, त्यावरून मला कमजोर करण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले. हे सरकार सर्वांच्या प्रयत्नातून बनले आहे. त्यामुळे मी कुणाच्याही दबावाखाली येणार नाही, असेही विक्रमादित्य यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, विक्रमादित्य यांनी केवळ मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. हिमाचल प्रदेशातील जनतेशी संवाद साधून पुढील पावले टाकली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात काँग्रेसमधील दुफली चव्हाट्यावर आल्याने सरकारवर संकट आल्याचे स्पष्ट झाले आहे. आता विक्रमादित्य काय भूमिका घेणार, त्यांच्यासोबत किती आमदार आहेत, काँग्रेस यातून कसा मार्ग काढणार, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उभे राहिले आहेत.

Vikramaditya Singh, Virbhadra Singh
Rajya Sabha Election 2024 : उत्तर प्रदेश अन् हिमाचलमध्ये 'इंडिया'ला धक्का; कर्नाटकात काँग्रेसचे 3 उमेदवार विजयी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com