Life imprisonment for police : पोलिसांना हादरवणारी बातमी! महानिरीक्षकांसह संपूर्ण ‘SIT’ला जन्मठेप, आरोपीचा मृत्यू कारणीभूत

Himachal Pradesh Police Custodial Death News : पोलिसांच्या मारहाणीत आरोपीचा 2017 मध्ये कोठडीत मृत्यू झाला होता.  
Police
Policesarkarnama
Published on
Updated on

Shimla Court News : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरवरून वाद निर्माण झाला आहे. कोर्टाने पाच पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. तर परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या पोलिस कोठडीतील मृत्यूचा मुद्दाही तापलेला आहे. महाराष्ट्रात या प्रकरणांची चर्चा सुरू असतानाच पोलिसांना हादरवणारी बातमी आहे.

चंदीगढमधील सीबीआय कोर्टाने आरोपीच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी महानिरीक्षकांसह आठ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण 2017 मधील आहे. हिमाचल प्रदेशातील सिमला येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार व खूनप्रकरणाशी संबंधित संशयित आरोपीचा कोठडीत मृत्यू झाला होता. पोलिसांनी बलात्कार व खूनप्रकरणी सात जणांना अटक केले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तत्कालीन आयजी जहूर जैदी यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन केली होती.

Police
Donald Trump News : ट्रम्प यांचा मोदींना पहिल्यांदाच फोन; जगात खळबळ उडवून दिलेल्या ‘त्या’ आदेशावर केलं सावध...

ता. 18 जुलै 2017 रोजी कोटखाई पोलिस ठाण्यात आरोपी सूरजची चौकशी सुरू असताना पोलिसांकडून जबर मारहाण करण्यात आली. मात्र, यादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर एका कर्मचाऱ्याने फोनवरून डीएसपी मनोज जोशी यांना फोनवरून सर्व घटनाक्रम सांगितला. हा संवादच पुढे शिक्षेसाठी महत्वाचा पुरावा ठरला. या प्रकरणानंतर मोठा वाद झाला आणि नंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला.

सीबीआयने गुन्हा नोंद करत जैदी यांच्यासह इतर आरोपींना अटक केली. नंतर त्यांना जामीन मिळाला. मात्र, आरोपींनी या प्रकरणाची सुनावणी राज्याबाहेर घेण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. त्यानंतर हे प्रकरण चंदीगडमधील विशेष सीबीआय कोर्टात वर्ग करण्यात आले. या कोर्टाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणीही एका आरोपीला शिक्षा झाली आहे.

Police
Ram Rahim Parole : दिल्ली निवडणुकीपूर्वी राम रहिमची तुरूंगातून सुटका, पहिल्यांदाच 'त्या' आश्रमात जाण्याचीही परवानगी

कोण आहेत शिक्षा झालेले पोलिस?

तत्कालीन आयजी जहूर जैदी, डीएसपी मनोज जोशी यांच्यासह आठ पोलिस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामध्ये पोलिस उपनिरीक्षक राजिंदर सिंह, सहायक पोलिस निरीक्षक दीप चंद शर्मा, हेड कॉन्स्टेबल मोहन लाल, सूरत सिंह, रफी मोहम्मद, रानित सटेटा यांचा समावेश आहे. सूरज यांचा कोठडीत खून झाल्याप्रकरणी कोर्टाने त्यांना दोषी धरले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com