Donald Trump News : ट्रम्प यांचा मोदींना पहिल्यांदाच फोन; जगात खळबळ उडवून दिलेल्या ‘त्या’ आदेशावर केलं सावध...

PM Narendra Modi US Visit President phone call : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात सोमवारी रात्री फोनवरून संवाद झाला.
Donald Trump, Narendra Modi
Donald Trump, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी रात्री पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधला. ट्रम्प हे पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्याने दोन्ही देशांमधील संबंधांकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. त्यात ट्रम्प यांच्या एका आदेशामुळेही जगभरातील अनेक देशांचे टेन्शन वाढले आहे. या विषयावरही ट्रम्प यांनी मोदींशी संवाद साधला आहे.

दोन्ही नेत्यांचा फोनवरून संवाद झाल्यानंतर ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींच्या फेब्रुवारी महिन्यातील अमेरिका दौऱ्याची घोषणा केली. त्यामुळे दोन्ही नेत्यांची पुढील काही दिवसांत भेट होणार हे निश्चित मानले जात आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट असेल.

Donald Trump, Narendra Modi
Ram Rahim Parole : दिल्ली निवडणुकीपूर्वी राम रहिमची तुरूंगातून सुटका, पहिल्यांदाच 'त्या' आश्रमात जाण्याचीही परवानगी

ट्रम्प यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर लगेच अमेरिकेत बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या इतर देशांतील नागरिकांना परत पाठवण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये भारतातील अनेक नागरिक सध्या अमेरिकेत वास्तव्याला आहेत. हा मुद्दाही ट्रम्प यांनी मोदींशी बोलताना उपस्थित केला. बेकायदेशी नागरिकांना परत घेण्याबाबत भारत योग्य पावले उचलेल, अशी अपेक्षा ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे.

ट्रम्प यांच्या ‘अमेरिका प्रथम’ या मोहिमेतील हा महत्वाचा मुद्दा आहे. निवडणुकीदरम्यानच त्यांनी हे आश्वासन दिले होते. त्यासाठी ट्रम्प यांनी कडक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. अमेरिकेच्या दोन लष्करी विमानांतून रविवारी कोलंबियातील नागरिकांना मायदेशी पाठवण्यात आले होते. पण या देशाने विमानांना उतरण्यास परवानगी नाकारली होती. त्यावरून वाद निर्माण झाला होता.

Donald Trump, Narendra Modi
Sanjay Nirupam: हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावून काँग्रेस काय साध्य करू इच्छिते? शिवसेना नेत्याचा हल्लाबोल

अमेरिकेने लगेच कोलंबियावर 25 टक्के कर लादण्याचा आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या प्रवासावर बंदीचा आदेश काढला. त्यानंतर मात्र, कोलंबिया सरकार नरमले आणि विमानांना उतरण्यास परवानगी दिली. अशी स्थिती इतर देशांबाबत उद्भवल्यास ट्रम्प यांच्याकडून कडक पावले उचलली जाऊ शकतात. मोदींशी संवाद साधताना ट्रम्प यांनी या मुद्यावर चर्चा करत भारतालाही एकप्रकारे सावध केल्याचे मानले जात आहे.      

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com