Himachal Pradesh: 2 ऑक्टोबरपासून अडीच लाख लाडक्या बहीणींना मिळणार 1500 रुपये

Himachal Pradesh Women Scheme: हिमाचल प्रदेश सरकार २ ऑक्टोबरपासून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. सुमारे २.५ लाख महिलांच्या खात्यात १,५०० रुपये जमा केले जाणार आहे.
Himachal Pradesh Women Scheme
Himachal Pradesh Women SchemeSarkarnama
Published on
Updated on

Himachal Pradesh Government Scheme: हिमाचल प्रदेशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राज्य सरकारकडून मोठ्या मदतीची तयारी सुरू आहे. येत्या 2 ऑक्टोबरला दोन महत्त्वाच्या कल्याणकारी योजनांना सुरुवात करण्याचा सरकारचा मानस आहे.

याचा थेट फायदा लाखो महिला आणि गरीब कुटुंबांना होणार आहे. एका योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे, तर दुसऱ्या उपक्रमातून सुमारे 1.80 लाख गरीब कुटुंबांना 300 युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे.

महिलांच्या खात्यात थेट 1500 रुपये

‘इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सम्मान निधी’ या योजनेतून 21 ते 60 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेच्या नवव्या टप्प्यात सुमारे 10 हजार नवीन अर्ज येण्याची शक्यता आहे. यापूर्वीच्या टप्प्यात ग्रामीण विकास विभागाकडे जवळपास 2.41 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. नव्या अर्जांचा समावेश केल्यानंतर लाभार्थी महिलांची संख्या सुमारे अडीच लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

Himachal Pradesh Women Scheme
Madanlal Bafna Passes Away: काँग्रेसचे माजी आमदार, माजी राज्यमंत्री मदनलाल बाफना यांचे निधन

नवव्या टप्प्यात आलेल्या अर्जांची छाननी आणि पात्रता तपासणी पूर्ण केल्यानंतर 25 सप्टेंबरपर्यंत एसडीएम स्तरावर पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

Himachal Pradesh Women Scheme
PF News: तुमच्या PF खात्यात किती पैसे आहेत? WhatsApp वर फक्त ‘Hello’ पाठवा अन् लगेच जाणून घ्या!

1.80 लाख कुटुंबांना मोफत वीज

महिलांसाठीच्या आर्थिक मदतीसोबतच राज्यातील गरीब कुटुंबांनाही सरकारकडून दिलासा मिळणार आहे. सुमारे 1.80 लाख आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांची 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळण्यासाठी निवड करण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र कुटुंबांचा घरगुती वीज खर्च कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

दोन्ही योजनांची अंमलबजावणी थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने करण्याची तयारी आहे. त्यामुळे पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम मिळणार आहे. तसेच मोफत वीज योजनेसाठी पात्र कुटुंबांची निवड प्रक्रिया सुरू आहे.

2 ऑक्टोबरला या दोन्ही योजनांचा शुभारंभ करण्याची तयारी सरकारकडून केली जात असून, मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्याकडून याबाबत अधिक माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना घरखर्चाच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com