Himanta Biswa Sarma : धडाकेबाज मुख्यमंत्री सरमा आपल्याच निर्णयाने फसले; द्यावा लागला करिअर घडवणाऱ्या पदाचा राजीनामा...

Guwahati High Court Bar Association : मुख्यमंत्री सरमा यांच्या सरकारने हायकोर्टाला गुवाहाटीवरून रंगमहल येथे हलविण्याचा निर्णय घेतला आहे.
Himanta Biswa Sarma
Himanta Biswa SarmaSarkarnama
Published on
Updated on

Assam CM News : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे धडाकेबाज निर्णय घेणारे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. पण त्यांना त्यांच्याच एका महत्वपूर्ण निर्णयामुळे एका पद सोडावे लागले आहे. त्यांनी बुधवारी गुवाहाटी हायकोर्ट बार असोसिएसनच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. असोसिएशनने सरमा यांनी मुख्यमंत्री म्हणून घेतलेल्या एका निर्णयाला कडाडून विरोध केला आहे.

मुख्यमंत्री सरमा यांच्या सरकारने हायकोर्टाला गुवाहाटीवरून रंगमहल येथे हलविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला वकिलांच्या संघटनेने जोरदार विरोधात केला आहे. सरमा हे या संघटनेचे सदस्य होते. सदस्यपदाचा राजीनामा देताना त्यांनी म्हटले आहे की, गुवाहाटी हायकोर्टाच्या शिफारशीनुसार घेतलेल्या निर्णयाला हायकोर्ट बार असोसिएशनकडून विरोध होत असल्याचे निदर्शनास आले. सध्याच्या पायाभूत सुविधा पुरेशा नाहीत. पुढील काही दिवसांत परिस्थिती आणखी बिघडू शकते.

Himanta Biswa Sarma
Jagdeep Dhankhar News : 'सुप्रीम' नाराजीनंतरही धनखड यांचा पुन्हा प्रहार; यावेळी शपथच काढली...

मुख्यमंत्री सरमा यांच्या सध्याच्या विधानसभा मतदारसंघात नव्याने हायकोर्टाची इमारत बांधण्याचे प्रस्तावित आहे. याचा फायदा निवडणुकीत सरमा यांना होईल, अशी चर्चा ज्येष्ठ वकिलांमध्ये होती. त्यावरही सरमा यांनी राजीनामा पत्रात लिहिले आहे की, हायकोर्टाच्या समितीच्या शिफारशीनुसार ही जागा निवडण्यात आली आहे. तसेच मतदारसंघ पुनर्रचनेनंतर हा भाग माझ्या मतदारसंघात येत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राजकीय फायद्यासाठी हा निर्णय घेतल्याच्या आरोपांना कसलाही आधार नसल्याचेही सरमा यांनी स्पष्ट केले आहे. हायकोर्टाच्या शिफारशीला असोसिएशनचा विरोध असल्याने नैतिकदृष्ट्या या असोसिएशनसोबत आपण राहू शकत नसल्याचे सांगत सरमा यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. न्यायालयीन सुधारणांसाठी आणि आपल्या न्यायिक व्यवस्थेच्या भल्यासाठी हा राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

Himanta Biswa Sarma
Mamata Banerjee News : बंगालमध्ये निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का? मातब्बर नेता पत्नीसह ममतांना भेटला...

दरम्यान, सरमा हे 1994 ते 2001 काळात गुवाहाटी हायकोर्टात वकिली करत होते. याच काळात ते असोसिएशनचे सदस्य बनले. मात्र, त्यांना तिथे बसण्यासाठीही जागा मिळत नव्हती. त्यामुळे आपली पुस्तके आणि फायली ठेवण्यासाठी ते आपल्या कारचाच वापर करत होते. आजही कोणत्याही नवीन वकिलांसाठी ही स्थिती बदललेली नाही, असे सरमा यांनी पत्रात म्हटले आहे. सरमा यांच्यासोबत महाधिवक्ता देवजित सैकिया यांनीही असोसिएशनच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com