Nagpur Crime : गृहमंत्र्यांच्या नागपुरातच गोळीबाराचा थरार! दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने भरबाजारात तरूणाला संपवलं

Nagpur Shooting News : राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे भर बाजारात एका तरूणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. ही घटना मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोधनी प्रकाशनगर परिसरात घडली आहे.
Nagpur Shooting News
Nagpur Shooting NewsSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 04 Apr : राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे भरबाजारात एका तरूणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. ही घटना मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोधनी प्रकाशनगर परिसरात घडली आहे.

या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे तर आणखी एक तरूण गंभीर जखमी आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. तर या धक्कादायक घटनेमुळे नागपुरातील (Nagpur) कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गृहमंत्र्यांच्या शहरातच लोकांना कायद्याचा धाक उरला नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Nagpur Shooting News
Jaykumar Gore Video : 'त्यांना कायमचे संपवून माझ्यासोबत बीडप्रमाणे कट घडवायचा होता', जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप; म्हणाले, पुरावे माझ्या...

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी रात्री दहाच्या सुमारास प्रकाशनगर येथील गोविंद लॉनजवळ बाजारात चार आरोपी दुचाकीवरून आले होते. बाजारात येताच या चौघांनी अचानक शिवीगाळ सुरू केली. यावेळी त्यांनी तिथल्या लोकांजवळ शाहरूख नावाच्या तरूणाची चौकशी केली.

यावेळी एकाने थेट पिस्तूल बाहेर काढलं आणि गोळीबार करायला सुरूवात केली. या गोळीबारात सोहेल खान नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर आणखी एक गंभीर जखमी झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या आरोपीने गोळीबार करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो बेधडक गोळ्या झाडताना दिसत आहे.

Nagpur Shooting News
Manoj Kumar Passes Away : ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन

भाजीचा ठेला लावण्यावरून हा वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून आता पोलिसांनी (Police) या घटनास्थळी बंदोबस्त तैनात केला आहे. मात्र भर बाजारात गोळीबार झाल्याची घटनेमुळे शहरात भीतीचं वातावरण आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com