गृहमंत्री शहांनी केली ओवेसींना विनंती; म्हणाले आमच्या चिंतेचे समाधान करा..

केंद्र सरकारने (Central Government) दिलेली झेड दर्जाची सुरक्षा खासदार असादुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी नाकारली आहे.
Asaduddin Owaisi & Amit Shah
Asaduddin Owaisi & Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

दिल्ली : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (MIM) पक्षाचे प्रमुख आणि खासदार असादुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या उत्तर प्रदेशात (UP) झालेल्या वाहनावरील हल्ल्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज (ता.7 फेब्रुवारी) राज्यसभेमध्ये निवेदन सादर केले. ओवेसींवर झालेल्या हल्ल्यासंदर्भातील माहिती देताना ओवेसींना केंद्राकडून देण्यात आलेली झेड सुरक्षा (Z Security) स्वीकारावी आणि आमच्या चिंतेचे समाधान करावे, अशी विनंती केली आहे.

Asaduddin Owaisi & Amit Shah
सिध्दूंच्या बालेकिल्ल्याला पडणार खिंडार? बड्या नेत्यानं आव्हान स्वीकारल्यानं अडचणीत

उत्तर प्रदेशात निवडणूक प्रचारासाठी आलेले ओवेंसी हे हापूर येथून दिल्लीला जाताना हापूर-गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावर ३ फेब्रवारी रोजी सायंकाळी अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केला होता. मात्र, या हल्ल्यात कुणीही जखमी झाले नव्हते. हा संपूर्ण प्रकार टोलनाक्यावरील सीटीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या हल्ल्यासंदर्भात देशाचे गृहमंत्री शाह यांनी पहिल्यांदाच याबाबत आज राज्यसभेत निवेदन सादर केले असून संपुर्ण घटनाक्रम सांगितला व ओवेसींनी याआधी त्यांनी तेलंगणा सरकार व केंद्र सरकारची सुरक्षा नाकारल्याचे सांगितले. तर, त्यांना काही धोका होऊ नये यासाठी केंद्रसरकारकडून देण्यात आलेली झेड प्लस सुरक्षा घेण्याची विनंती केली आहे.

शाह आपल्या निवेदनात म्हटले, दोन अज्ञात व्यक्तींनी ओवैसींच्या गाडीवर तीन गोळ्या झाडण्यात आल्या आहे. यामध्ये कोणीही जखमी झाले नसून गाडीच्या खालच्या बाजूला तीन गोळ्या लागल्या आहेत. या प्रकरणी तीन साक्षीदार असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून दोघांकडून प्रत्येकी एक पिस्तूल जप्त केले आहे.ओवेसींचा हापूर जिल्ह्यामधील दौरा नियोजित नव्हता. ते जिल्ह्यामध्ये येणार आहेत याबद्दल स्थानिक प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. मात्र, हल्ल्याच्या या घटनेनंतर ते सुरक्षितपणे दिल्लीत पोहचले, अशी माहिती शाह यांनी सभागृहात दिली.

Asaduddin Owaisi & Amit Shah
शाहरूखच्या त्या कृतीने राजकारणही ढवळले आणि सोशल मिडियातही पडसाद!

शाह यांनी आपले निवेदन सादर केल्यावर माझे निवेदन संपले, असे सांगत ओवेसी यांनी आम्हाला ज्या तोंडी सूचना केल्यात त्याप्रमाणे त्यांनी अजूनही सुरक्षा घेण्यास नकार दिला आहेत. मी या सभागृहाच्या माध्यमातून ओवेसींना विनंती करतो की, त्यांनी सुरक्षा घ्यावी आणि आम्हा सर्वांच्या चिंतेचे समाधान करावे असे आवाहन ओवेसींना केले.

दरम्यान, केंद्र सरकारने दिलेली झेड दर्जाची सुरक्षा ओवेसींनी नाकारली आहे. याप्रकरणी ओवेसी म्हणाले होते की, माझ्या वाहनावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर केंद्र सरकारने कठोर कारवाई करावी. त्यांच्यावर बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याच्या (UAPA) तरतुदींनुसार कारवाई करावी व देशातील कट्टरतावादा संपवावा. मला झेड सुरक्षेची गरज नाही. मला ए दर्जाचे नागरिक होण्याची इच्छा आहे. मला जगायचे आहे, बोलायचे आहे. जेव्हा या देशातील गरीब सुरक्षित असतील, त्यावेळीच मी सुरक्षित असेल. माझ्या गाडीवर हल्ला करणाऱ्यांना घाबरायची मला गरज नाही. सरकार या हल्लेखोरावर ‘यूएपीए’ नुसार का कारवाई करत नाहीत, असे मत व मागणी ओवेसींनी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com