Rahul Gandhi: तुम्ही फक्त नाच म्हणा...; बिहारच्या प्रचार सभेत राहुल गांधींची PM मोदींवर जहरी टीका

Rahul Gandhi: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा ज्वर आता चढायला लागला आहे. राजकीय नेते मंडळींकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि वैयक्तिक टिका-टिप्पण्या सुरु झाल्या आहेत.
Rahul Gandhi, PM Narendra Modi
Rahul Gandhi, PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi: बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात लोकसभेचे विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराच्या पद्धतीवर सडकून टीका केली. तुम्ही नरेंद्र मोदींना तुमच्या मतांच्या बदल्यात नाचायला सांगितलं तर ते स्टेजवर नाचतीलही, अशा शब्दांत राहुल गांधींनी पंतप्रधानांना टोमणा मारला. मुझफ्फरपूरमध्ये राजद नेते आणि महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांच्यासमवेत संयुक्त रॅलीला संबोधित करताना त्यांनी हे भाष्य केलं.

Rahul Gandhi, PM Narendra Modi
Phaltan Doctor Death: सुसाईड नोटमधील शब्दाची चुकली वेलांटी! सुषमा अंधारेंच्या खळबळजनक खुलाशानं पोलीस संशयाच्या भोवऱ्यात

राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याचा अमेरिकेचा डाव होता, तो रशियाच्या मदतीनं भारतानं उधळून लावला, अशा बातम्या मध्यतंरी आल्या होत्या. या बातम्या म्हणजे बिहारच्या निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी मोदींनी केलेली स्टंटबाजी असून मतांसाठी ते काहीही करु शकतात. त्यामुळं जर तुमच्या मतांच्या बदल्यात मोदींना तुम्ही नाचायला लावलं तर ते स्टेजवर नाचतीलही अशा शब्दांत राहुल गांधींनी पंतप्रधानांना टोमणाही मारला.

Rahul Gandhi, PM Narendra Modi
Jayant Patil : जयंत पाटलांच्या मतदारसंघातूनच महाविकास आघाडीला सुरुंग : एका घोषणेने राजकारण ढवळून निघणार!

मोदींच्या ड्रामेबाजीचा आणखी एक किस्सा असं संबोधत राहुल गांधींनी म्हटलं की, छट पूजा हा बिहारी लोकांचा सर्वात मोठा सण आहे. या सणानिमित्त भाविकांनी प्रदुषित यमुना नदीत डुबकी मारुन प्रार्थना केल्याचे व्हिडिओ समोर आले. त्यानंतरविधानसभा निवडणुकीला अवघा एक आठवडा उरला असताना, राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर कोणताही हल्लाबोल केला नाही.

Rahul Gandhi, PM Narendra Modi
Devendra Fadnavis News : सगळं ठरलं होतं, बच्चू कडूंचा अर्ध्या रात्री मेसेज अन्..! फडणवीसांनी सांगितला घटनाक्रम

बिहारी लोकांसाठी सर्वात मोठा सण असलेल्या नुकत्याच संपलेल्या छठ पूजाकडे लक्ष वेधत, त्यांनी दिल्लीतील प्रदूषित यमुनेत प्रार्थना करणाऱ्या भाविकांकडं लक्ष वेधलं. पंतप्रधानांनीही यमुनेत डुबकी मारल्याचं दिसलं पण त्यांनी यमुना नदीत नव्हे तर खास बनवलेल्या तलावात डुबकी मारल्याचा दावा राहुल गांधींनी केला आहे. नरेंद्र मोदी त्यांच्या स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करायला गेले होते. त्यांचा यमुनेशी काहीही संबंध नाही. त्यांचा छठपूजेशी काहीही संबंध नाही. त्यांना फक्त तुमची मतं हवी आहेत," असा आरोपही त्यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com