Phaltan Doctor Death: सुसाईड नोटमधील शब्दाची चुकली वेलांटी! सुषमा अंधारेंच्या खळबळजनक खुलाशानं पोलीस संशयाच्या भोवऱ्यात

Phaltan Doctor Death Case: महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेतून मृत डॉक्टर महिलेचं चारित्र्य हनन केल्याचा आरोप करत याप्रकरणात त्यांनी पडूच नये, अशा आक्रमक शब्दांत अंधारेंनी आपला संताप व्यक्त केला.
Satara Doctor Death Case
Satara Doctor Death CaseSarkarnama
Published on
Updated on

Phaltan Doctor Death Case: फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आणखी एक खळबळजनक खुलासा केला आहे. डॉक्टर महिलेच्या हातावर लिहिलेल्या कथित सुसाईड नोटमधील एका शब्दाची वेलांटी चुकली असल्यानं त्यावरुन खळबळजनक दावा केला असून याद्वारे त्यांनी पोलीस तपासासमोर नवं आव्हान उभं केलं आहे.

Satara Doctor Death Case
Yogi Adityanath announcement : धडाकेबाज योगी सरकारचे आणखी एक नामांतर; 'मुस्तफाबाद'चे नवीन नाव काय असणार?

सुषमा अंधारेंनी आपल्या पत्रकार परिषदेत पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे मृत्यू प्रकरणाचा दाखला दिला. पत्रकार परिषदेत त्यांनी एका बातमीचा संदर्भ देताना म्हटलं की, अश्विनी बिद्रे मृत्यू प्रकरणात तपास भरकटवण्याचा प्रयत्न झाला होता. ज्यांनी हत्या केली ते दाखवत होते की अश्विनी बिद्रे जिवंत आहेत. बिद्रेंच्या मोबाईलवरुनच त्यांच्या मेव्हण्याला आरोपीनं How r u...ऐवजी How r Y असा चुकीचा मेसेज टाकला. पण अश्विनी बिद्रे या कधीही U ऐवजी Y टाईप करत नव्हत्या. उलट संशयीत आरोपी अभयकुमार कुरुंदकर यालाच U ऐवजी Y लिहिण्याची सवय असल्याचं त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांनी चौकशीदरम्यान सांगतलं. म्हणजे या प्रकरणात आरोपी कुरुंदकर हा केवळ या चुकीच्या शब्दांवरुन पकडला गेला होता. म्हणजे केवळ चुकीच्या शब्दांमुळं या प्रकरणाचं खरंतर गुढ उकललं होतं.

Satara Doctor Death Case
Devendra Fadnavis News : सगळं ठरलं होतं, बच्चू कडूंचा अर्ध्या रात्री मेसेज अन्..! फडणवीसांनी सांगितला घटनाक्रम

दरम्यान, अश्विनी बिंद्रे प्रकरणाचा दाखला सुषमा अंधारे यांनी यासाठी दिला की, फलटणच्या डॉक्टर महिलेच्या पोलिसांना लिहिलेल्या चार पानी तक्रार अर्जामध्ये तीनं 'पोलीस निरीक्षक' हा शब्द ९ वेळा लिहिला होता. या सर्व ९ वेळा निरीक्षक हा शब्द तीनं निरीक्षक असाच लिहिला होता, त्यातील दोन्ही वेलांट्यांमध्ये कुठलाही बदल तीनं केलेला नव्हता. पण मृत्यूनंतर तिच्या हातावर जी सुसाईड नोट आढळून आली होती, त्यात मात्र निरीक्षक हा शब्द निरिकशक अशा पद्धतीनं लिहिलेला होता. म्हणजेच शब्दातील वेलाटी चुकल्यामुळं अंधारे यांनी असा दावा केला की, ज्या पद्धतीनं केवळ शब्द चुकल्यामुळं अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचं गुढ उकललं होतं. त्याच प्रमाणे फलटणच्या डॉक्टर महिला मृत्यू प्रकरणातही संशय आहे. यावरुन तिची हत्या झाली असावी पण हे लपवण्यासाठी तिच्या हातावर दुसऱ्या कोणीतरी सुसाईड नोट लिहून ती आत्महत्या असल्याचं दाखवण्यात आलेलं असू शकतं, अशी शंका अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

Satara Doctor Death Case
UIDAI चा मोठा खुलासा, 'या' कामांसाठी Valid नाही आधार कार्ड

डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांनी विशेषतः तिच्या बहिणीनं डॉक्टरच्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमधील अक्षर तिचं नाही असा दावा केला आहे. त्यामुळं यापूर्वीच या प्रकरणात या पीडित कुटुंबानं आमच्या मुलीची हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केला आहे. पण तरीही महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून या डॉक्टर महिलेच्या चॅटचा उल्लेख करत तिचं चारित्र्य हनन करण्यात आल्याचा आरोप काल सुषमा अंधारे यांनी केला होता. त्यामुळं याप्रकरणात आता चाकणकरांनी पडू नये, अशा आक्रमक शब्दांत अंधारेंनी आपला संताप व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com