Manipur BJP Government: भाजपला मणिपूरमध्ये मोठा धक्का; 'या' मित्रपक्षाने पाठिंबा काढला

Kuki People's Alliance Withdraw Support: कुकी पीपल्स अलायन्सने सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची घोषणा केली
BJP
BJP Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Manipur Political News: गेल्या अनेक दिवसांपासून मणिपूरमध्ये हिसांचाराच्या घटना समोर येत आहेत. असे असतानाच आता भाजपला सर्वात मोठा धक्का बसला असून मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या सरकारचा कुकी पीपल्स अलायन्सने पाठिंबा काढून घेतला आहे.

कुकी पीपल्स अलायन्स हा पक्ष एनडीएचा मित्रपक्ष आहे. मात्र, आता कुकी पीपल्स अलायन्सने सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची घोषणा केली असून मणिपूरमधील सरकारचे काय होणार? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. मात्र, मणिपूरमध्ये भाजपचे सरकार बहुमतात असल्याने सध्या तरी सरकारला कोणताही धोका नसल्याचे बोलले जाते.

BJP
Uddhav Thackeray On Modi : ''...तेव्हा तुम्ही इंडियाचे पंतप्रधान म्हणून जातात की इंडियन मुजाहिद्दीनचे प्रधानसेवक ?''; ठाकरेंचा मोदींवर पलटवार

मणिपूरमध्ये मे महिन्यापासून हिंसाचार सुरू आहे. जवळपास तीन महिने उलटून गेले तरीही परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही. यातच आता कुकी पीपल्स अलायन्सने भाजप सरकारचा पाठिंबा काढल्याने मणिपूरमध्ये राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. कुकी पीपल्स अलायन्सचे दोन आमदार असून त्यांनी बिरेन सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचे पत्र जारी केले आहे.

BJP
Jayant Patil News: पक्ष बांधणीसाठी जोमाने कामाला लागा; जयंत पाटलांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

मणिपूरमध्ये भाजपचे ३२ आमदार असून एनपीएफचे ५ आमदार आणि तीन अपक्ष आमदारांचा पाठिंबा भाजपला असल्याने सध्या तरी भाजपचे सरकार बहुमतात आहे. मात्र, एकीकडे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप बेरजेचे राजकारण करत असतानाच आता कुकी पीपल्स अलायन्सने भाजपचा पाठिंबा काढल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com