घोळात घोळ संपला! अखेर समाजवादी अत्तरवाल्या जैनवर छापे पडलेच

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अत्तर व्यावसायिकावर पडलेल्या छाप्यांवरून गदारोळ सुरू आहे.
Pushparaj Jain

Pushparaj Jain

Sarkarnama

Published on
Updated on

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आता विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) रणधुमाळी सुरू आहे. यातही अत्तर व्यावसायिक पीयूष जैन (Piyush Jain) यांच्यावर पडलेल्या छाप्यांची मोठी चर्चा सुरू होती. हे छापे समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) आमदार पुष्पराज जैन (Pushpraj Jain) यांच्यावर पडणार होते पण पीयूष जैन यांच्यावर पडले, अशीही चर्चा सुरू होती. अखेर आज सकाळी पुष्पराज जैन यांच्यावर छापे पडले असून, आधीची चर्चा खरी ठरल्याचे बोलले जात आहे.

प्राप्तिकर विभागाने आज सकाळी पुष्पराज जैन यांच्या अत्तर व्यवसायाशी निगडित उत्तर प्रदेश, दिल्ली आणि मुंबईतील 50 ठिकाणी छापे मारले. यात जैन यांच्या मालकीचे पेट्रोल पंप आणि कोल्ड स्टोरेजचाही समावेश आहे. प्राप्तिकर विभागाकडून छापे मारण्याची कारवाई सुरू असून, यात काही सापडल्याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. विधानसभा निवडणुकीआधी समाजवादी पक्षाच्या नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांकडून छापे मारले जात आहेत. यामुळे राजकीय गदारोळ सुरू आहे.

<div class="paragraphs"><p>Pushparaj Jain</p></div>
दबंग आयपीएस शिवदीप लांडेंवर बिहारमध्ये मोठी जबाबदारी

समाजवादी अत्तर बाजारात आणणारे पीयूष जैन हेच आहेत, असा आरोप भाजप (BJP) नेते करीत आहेत. याच आधारे भाजप नेते जैन यांचे कनेक्शन समाजवादी पक्ष आणि अखिलेश यादव यांच्याशी जोडत होते. नंतर समाजवादी अत्तर बाजारात आणणारे पुष्पराज जैन हे असल्याचे समोर आले. ते समाजवादी पक्षाचे नेते आहेत. पुष्पराज जैन यांच्यावर छापे टाकायचे होते पण चुकून भाजपने त्यांचेच उद्योगपती पीयूष जैन यांच्यावर टाकले, असा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, केंद्रीय यंत्रणांनी याचा इन्कार करीत हे छापे पीयूष जैन यांच्यावरच टाकण्यात येणार होते, असा दावा केला होता.

<div class="paragraphs"><p>Pushparaj Jain</p></div>
जिल्हा बँकेच्या विजयावर निलेश राणेंची पहिली प्रतिक्रिया अन् नवीन वादाला निमंत्रण

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. प्रसिद्ध अत्तर व्यावसायिक पीयूष जैन यांच्या घरात सापडलेल्या दोनशे कोटी रुपयांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शहांनी जैन यांचा संबंध समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशी जोडला आहे. भाजपने आपल्याच उद्योगपतीवर चुकून छापे मारले, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे. जैन यांचे कॉल रेकॉर्ड जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे. जैन यांच्या कॉल रेकॉर्डमधून अनेक भाजप नेत्यांची नावे समोर येतील, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com