IT Raid : बँकेचे नव्हे, हे आहे खासदाराचे लॉकर; पैसे मोजण्यासाठी तीन डझन मशीन, ५० हून अधिक कर्मचारी...

Congress MP : काँग्रसेचे राज्यसभेचे खासदार धीरज साहू यांच्याकडे बेहिशेबी संपत्ती...
Congress MP Dheeraj Sahu
Congress MP Dheeraj SahuSarkarnama
Published on
Updated on

Dheeraj Sahu News : एखाद्या बँकेच्या लॉकरमध्येही एवढे पैसे नसतील एवढ्या नोटा काँग्रेसच्या खासदाराकडे सापडल्या आहेत. या नोटा मोजण्यासाठी तब्बल तीन डझन मशीन आणि ५० हून अधिक कर्मचारी लावण्यात आले आहेत. नोटांची मोजदाद सलग चार दिवस सुरू असून, आतापर्यंत केवळ निम्मेच काम झाले आहे. सुमारे अडीचशे कोटींहून अधिक रक्कम असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आयकर विभागाने धाड टाकल्यानंतर काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार धीरज साहू यांची कंपनी, कारखाने, संबंधित विविध ठिकाणी बेहिशेबी पैसे आढळून आले आहेत. विभागाने साहू यांच्या झारखंड व ओडिशा येथील घरी, कारखान्यांसह इतर मालमत्तांवर धाड टाकत झडती सुरू केली आहे. बुधवारपासूनच झाडाझडती सुरू असून, दररोज नवनवे कारनामे समोर येत आहेत.

Congress MP Dheeraj Sahu
Telangana Assembly : ओवेसींची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती; भाजपचे आमदार खवळले, घेतला मोठा निर्णय

साहू यांच्याकडे शुक्रवारपर्यंत २०० कोटींहून अधिक बेहिशेबी रक्कम आढळून आली आहे. शनिवारीही धाडसत्र सुरूच असून, रांची येथून पैशांनी भरलेल्या तीन बॅग ताब्यात घेण्यात आल्या आहे. ओडिशा येथील मद्याच्या कारखान्याच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या बंटी साहू यांच्याकडून पैशांच्या १९ बॅग जप्त करण्यात आल्या आहेत. ही रक्कम २० कोटी रुपयांच्या जवळपास असू शकते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ओडिशातील बोलंगिर परिसरात आयटी विभागाचे १०० हून अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. पुढील दोन दिवसांत पैशांची मोजदाद पूर्ण केली जाईल. त्यासाठी सध्या जवळपास ५० कर्मचारी असून, आणखी कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आल्याची माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. आतापर्यंत १७६ बॅगा आढळून आल्यास असून, केवळ ४० बॅगांची मोजदाद झाली आहे. आतापर्यंत ४० कोटी रक्कम मोजण्यात आली आहे.

Congress MP Dheeraj Sahu
Mahua Moitra : एक कुत्रा ठरला महुआ मोईत्रा यांच्या लोकसभेतून हकालपट्टीचे कारण; नेमकं काय आहे प्रकरण...

पीटीआयच्या वृत्तानुसार, पैसे मोजण्यासाठी आयटी विभागाने तीन डझन मशिनची व्यवस्था केली आहे. मशिनची क्षमता कमी असल्याने हे काम धीम्यागतीने सुरू आहे. एका कारखान्यातील कपाटातून सुमारे २०० कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम इतर ठिकाणांहून जप्त करण्यात आली असून, हे काम अजूनही सुरूच आहे.

(Edited By - Rajanand More)

Congress MP Dheeraj Sahu
Narendra Modi : जागतिक लोकप्रिय नेत्यांमध्ये मोदी कितव्या स्थानी ? 18 टक्के लोकांनी केलं नापसंत...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com