काँग्रेसची ताकद वाढली..अपक्ष आमदारांनी हातात घेतला हात!

काँग्रेसनेही (Congress) आता आक्रमक भूमिका घेत आमदारांना आपल्याकडे ओढून घेण्यास सुरवात केली आहे.
Congress
CongressSarkarnama
Published on
Updated on

पणजी : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर गोव्यातील (Goa) राजकारण चांगलेच तापले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली असून, राजकीय फोडाफोडीला सुरवात केली आहे. काँग्रेसनेही (Congress) आता आक्रमक भूमिका घेत आमदारांना आपल्याकडे ओढून घेण्यास सुरवात केली आहे. आता अपक्ष आमदार काँग्रेसमध्ये दाखल झाल्याने पक्षाची ताकद वाढली आहे.

अपक्ष आमदार प्रसाद गावकर (Prasad Gaonkar) यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सेंगुएम मतदारसंघाचे ते आमदार आहेत. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून आगामी विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतीच गावकर यांनी दिल्लीत पक्षाचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. मतदारसंघातील जनतेचा माझ्या निर्णयाला पाठिंबा असून, ते पुन्हा मला गोवा विधानसभेत पुन्हा पाठवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

गावकर यांनी त्यांचे बंधू आणि समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राज्यातील जनतेला आता भाजप नको आहे. दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारच्या काळात राज्यातील जनता खूष होती. आता काँग्रेसच राज्यात सत्ता स्थापन करेल, असे गावकर म्हणाले आहेत. दरम्यान, गावकर यांच्या समर्थकांनी जुलैमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. नंतर ऑक्टोबरमध्ये त्यांच्या समर्थकांनी तृणमूलला रामराम केला होता. अखेर गावकर काँग्रेसमध्ये दाखल झाले असून, त्यांचे समर्थकही काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत.

Congress
पर्रीकरांच्या मुलाचा भाजपला पहिला झटका! पणजीत आमदारांनी थांबवला प्रचार

गोव्यात विधानसभा निवडणुकीमुळे फोडाफोडीला जोर आला आहे. यात भाजपसह (BJP) तृणमूल काँग्रेस (TMC) आणि आम आदमी पक्षाने (AAP) आघाडी घेतली होती. आता काँग्रेसही मैदानात उतरली असून, भाजपला पहिला धक्का दिला होता. नुकतेच भाजपचे आमदार कार्लोस अल्मेडा (Carlos Almeida) यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Congress
तावडे 'बाजीगर' ठरले पण विजयावरील प्रश्चचिन्ह कायम!

कार्लोस अल्मेडा हे दोन वेळा वास्को द गामा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. पक्षाकडून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना पुढे केले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. भाजपमध्ये राहून सार्वजनिक जीवनात जनतेसाठी काम करणे अशक्य आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. भाजपचे आणखी आमदार पक्ष सोडण्याच्या वाटेवर असून, ते लवकरच राजीनामा देतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com