Assembly By Poll-Elections
Assembly By Poll-ElectionsSarkarnama

Assembly By Poll-Elections : इंडिया आघाडीची पहिली परीक्षा आज; सात विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू...

Assembly By Poll-Elections In Seven State : पोटनिवडणुकांच्या या जागांसाठी ८ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
Published on

Delhi News : आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या तयारीत असलेल्या इंडिया आघाडीची (India Alliance) पहिली परिक्षा आजपासून सुरू होत आहे. सहा राज्यांतील विधानसभेच्या सात जागांसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी आज मंगळवारी सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपचा मुकाबला करण्यासाठी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा असणार आहे. (Latest Marathi News)

Assembly By Poll-Elections
Maratha Aarakshan Andolan : मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन अर्जुन खोतकर उपोषणकर्ते जरांगे पाटील यांच्या भेटीला, सरकार मोठा निर्णय घेणार ?

इंडिया आघाडी उत्तर प्रदेशातील घोसी, झारखंडमधील डुमरी, त्रिपुरातील धनपूर-बॉक्सनगर आणि उत्तराखंडमधील बागेश्वर मतदारसंघातून एकत्रितपणे निवडणूक लढवत आहे. तर पश्चिम बंगालमधील धुपगुरी आणि केरळमधील पुथुपल्ली येथे आघाडीचेच घटक पक्ष एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवत आहेत. पोटनिवडणुकांच्या या जागांसाठी ८ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

घोसी (उत्तर प्रदेश) -

उत्तर प्रदेशातील घोसी ही जागा समाजवादी पक्षाचे (एसपी) आमदार दारा सिंह चौहान यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झाली होती. त्यांनी 'सपा'ला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केला. सत्ताधारी भाजपच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित एनडीएने चौहान यांना उमेदवारी दिली आहे, तर सपा उमेदवार सुधाकर सिंग यांना काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी पाठिंबा दिला आहे.

Assembly By Poll-Elections
Madhya Pradesh BJP News: भाजपचे मिशन मध्य प्रदेश : 3 सप्टेंबरपासून 'जन आशीर्वाद यात्रा, अमित शाह दाखवणार हिरवा झेंडा

धुपगुरी (पश्चिम बंगाल) -

धुपगुरी या जागेसाठी टीएमसी रिंगणात आहेत. तृणमूलने निर्मल चंद्र रॉय यांना उमेदवारी दिली आहे, त्यांच्यासाठी बंगाल सरकारमधील मंत्री फिरहाद हकीम आणि खासदार मिमी चक्रवर्ती यांनी जोरदार प्रचार केला. त्याचबरोबर तापसी रॉय भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारात प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार, शुभेंदू अधिकारी, दिलीप घोष यांनी प्रचार केला आहे.

धनपूर आणि बॉक्सनगर (त्रिपुरा)

सिपाहीजाला जिल्ह्यातील धनपूर आणि बॉक्सनगर जागेवर भाजप आणि सीपीएममध्ये लढत आहे.

पुथुपल्ली, (केरळ)

काँग्रेसचे दिग्गज नेते ओमन चंडी यांच्या निधनानंतरपुथुपल्ली या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. येथे लढत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ आणि एलडीएफ यांच्यात आहे.

बागेश्वर, उत्तराखंड

उत्तराखंडमधील बागेश्वर विधानसभेच्या जागेवर मंगळवारी होणाऱ्या पोटनिवडणुकीत पुन्हा एकदा भाजप आणि काँग्रेस यांच्यातच मुख्य लढत होणार आहे. पुष्करसिंग धामी यांच्या सरकारात परिवहन मंत्रीपदावर असलेले भाजपचे आमदार चंदन रामदास यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपशिवाय अन्य तीन पक्षांनीही आपले उमेदवार उभे केले आहेत.

Assembly By Poll-Elections
Sharad Pawar NCP Meeting: शरद पवार ‘इलेक्शन मोड’वर; राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांची बोलावली महत्वपूर्ण बैठक

डुमरी, झारखंड

डुमरी मतदारसंघातून सुमारे तीन लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या जागेवर सहा उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. डुमरी पोटनिवडणुकीत इंडियाच्या आघाडीच्या उमेदवार बेबी देवी यांची थेट लढत NDA उमेदवार यशोदा देवी यांच्याशी आहे.

आघाडी आणि एनडीएसाठी ही जागा प्रतिष्ठेची बनली आहे. राज्यातील सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) ने दावा केला आहे की 'इंडिया' आघाडी डुमरी येथून विजयाची सुरुवात करेल. एप्रिलमध्ये माजी शिक्षण मंत्री आणि झामुमोचे आमदार जगरनाथ महतो यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होत आहे. 2004 पासून महतो या जागेचे प्रतिनिधीत्व करत होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com