
Future Outlook for India's Economy : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. दोन्ही देशांमध्य युध्द होऊ नये, यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतही संयमाचा सल्ला देण्यात आला आहे. पण भारताक़डून पाकिस्तानचे नाक-तोंड दाबण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. यापार्श्वभूमीवर आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला धक्का देणारी आणि भारतासाठी आनंदाची बातमी आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा विश्वास दाखवला आहे. भारतीय अर्थव्यवस्था याचवर्षी जगात चौथ्या क्रमांकावर पोहचणार असल्याची शक्यता या संस्थेने वतर्विली आहे. जपानला या देशाला मागे टाकून भारत ही मजल मारणार आहे. ‘आयएमएफ’ने नव्या वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलुक एप्रिल 2025 मध्ये भारताची अर्थव्यवस्था किती मजबूत आहे, याचे संकेत दिले आहेत.
आयएमएफने चालू आर्थिक वर्षात भारताचा नॉमिनल जीडीपी 4,187.017 अब्ज डॉलरवर पोहण्याची आशा व्यक्त व्यक्त केली आहे. जपानसाठी हा शक्यता 4,186.431 अब्ज डॉलर एवढी वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार भारत काही अंतरानेच जपानला मागे टाकू शकतो. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था याचवर्षी जगात चौथ्या क्रमांकावर पोहचणार आहे. सध्या भारत पाचव्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका असून त्यापाठोपाठ चीन आणि जर्मनी असा क्रम लागतो.
भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल अशीच पुढेही वेगात सुरू राहण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. केवळ जपानच नाही तर भारत 2028 मध्ये जर्मनीलाही मागे टाकू शकतो. तेव्हा भारताचा जीडीपी 5,584.476 अब्ज डॉलरवर जाण्याची शक्यता आहे. त्यातुलनेत जर्मनीचा जीडीपी कमी असणार आहे. इतकेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सातत्याने उल्लेख केला जात असल्याने पाच ट्रिलियन डॉरल इकॉनॉमीचा टप्पा भारत 2027 मध्ये पार करू शकतो.
भारताची आर्थिक स्थिती मजबूत होत असताना पाकिस्तान अधिक कंगाल होणार आहे. आधीच बेताची आर्थिक स्थिती असलेल्या पाकिस्तानासाठी आयएमएफने झटका दिला आहे. 2025 मध्ये पाकिस्तानची जीडीपी 3 टक्क्यांवरून 2.6 टक्क्यांपर्यंत खाली घसरण्याची शक्यता आयएमएफने व्यक्त केली आहे. इतर काही संस्थांनीही येणारे वर्ष पाकिस्तानची चिंता वाढविणारे असल्याचे म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.