Sensitive Locations in Pune : युध्द झाल्यास का असेल पुणे टार्गेटवर? ‘ही’ अतिसंवेदनशील ठिकाणे केंद्रस्थानी...

Why Pune Is Considered a Strategic Target : महाराष्ट्रात अतिसंवेदनशील ठिकाणांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर साहजिकच मुंबई आहे. त्यानंतर उरण आणि तारापूर या ठिकाणांचा समावेश होतो.
Security personnel conducting a mock drill at a sensitive location in Pune, preparing for potential wartime scenarios.
Security personnel conducting a mock drill at a sensitive location in Pune, preparing for potential wartime scenarios. Sarkarnama
Published on
Updated on

India Vs Pakistan War : भारत आणि पाकिस्तानातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी (ता. 7) देशातील 244 ठिकाणी युध्दाचे मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिले आहे. या संवेदनशील ठिकाणांच्या यादीत महाराष्ट्रातील 16 ठिकाणे असून त्यात पुणे आणि पिंपरी चिंचवडचा समावेश आहे. युध्द झाल्यास पुणे किंवा पिंपरी चिंचवड हल्ला होऊ शकतो, असा त्याचा अर्थ आहे.

महाराष्ट्रात अतिसंवेदनशील ठिकाणांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर साहजिकच मुंबई आहे. त्यानंतर उरण आणि तारापूर या ठिकाणांचा समावेश होतो. दुसऱ्या श्रेणीमध्ये ठाण्यापाठोपाठ पुणे आणि त्यानंतर पिंपरी चिंचवड आहे. मुंबईनंतर पुणे हे राज्यातील सर्वात मोठे महानगर आहे. शिक्षण, आयटी, ऑटो अशा सर्वच क्षेत्रांमध्ये जगभर नावलौकिक असलेले पुणे लष्करासाठीही महत्वाचे ठिकाण आहे.

Security personnel conducting a mock drill at a sensitive location in Pune, preparing for potential wartime scenarios.
अमरावती, नागपुरात शेतजमीन..! भावी सरन्यायाधीश भूषण गवईंची संपत्ती किती?

का आहे पुणे संवेदनशील?

शत्रू घाम फोडणाऱ्या सुखोई विमानांचे तळ पुण्यात आले. पुणे विमानतळावर सुखोईची तुकडी असून तिथे दररोज विमानांचा सरावही सुरू असतो. त्यामुळे भारतीय लष्कराच्या दृष्टीने हे ठिकाणी अतिसंवेदनशील मानले जाते. त्याचप्रमाणे लष्कराचे दक्षिण मुख्यालयही पुण्यातच आहे. लष्कराला रसद पुरविणारा खडकी येथील दारूगोळा कारखानाही त्या यादीत आहे.

पाषण येथील डीआरडीओ ही संस्थाही भारतीय लष्कराची महत्वाची मानली जाते. तर खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट अशा आणखी काही लष्करी संस्था, केंद्रीय संस्था पुण्यात आहेत. पुण्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक आयटी, ऑटो कंपन्या आहेत. त्यामुळे जगाच्या नकाशावर पुण्याचे महत्व वाढत चालले आहे.

Security personnel conducting a mock drill at a sensitive location in Pune, preparing for potential wartime scenarios.
Local Body Elections : लागा तयारीला! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यांत होणार! सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश

पिंपरी चिंचवडही उद्योगनगरी म्हणून ओळखली जाते. दोन मोठ्या औद्योगिक वसाहती पिंपरी चिंचवडमध्ये आहेत. मोठ्या आयटी कंपन्यांही पिंपरी चिंचवड परिसरात असून पुण्याच्या विकासात या शहराचा मोठा हातभार आहे. पुण्यापाठोपाठ विकासामध्ये मोठी झेप घेतलेले पिंपरी चिंचवड हे शहरही आता महानगराच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड ही दोन्ही शहरे संवेदनशील ठिकाणांच्या यादीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com