RBI Report : भारताला मोठा झटका, FDI मध्ये ऐतिहासिक घट...

Historic Decline in FDI: What It Means for India : मागील आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये हा आकडा 10 बिलियन डॉलर एवढा होता. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मासिक बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
Sharp decline in India's FDI inflows
Sharp decline in India's FDI inflowsSarkarnama
Published on
Updated on

Drop in Foreign Investment : भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये परकीय थेट गुंतवणूक म्हणजेच FDI मध्ये आतापर्यंतची सर्वाधिक घट झाली आहे. ही घट तब्बल 96.5 टक्के एवढी प्रचंड आहे. एफडीआय घसरून 353 मिलियन डॉलरपर्यंत खाली आले आहे. भारताच्या एफडीआयमधील ही ऐतिहासिक घसरण असल्याचे सांगितले जात आहे.

मागील आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये हा आकडा 10 बिलियन डॉलर एवढा होता. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मासिक बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. परकीय थेट गुंतवणुकीमध्ये घसरण झाली असली तरी सकल एफडीआयमध्ये 13.7 टक्क्यांची वाढ झाली आहे. हा आकडा 81 बिलियन डॉलरपर्यंत पोहचला आहे. ही गुंतवणूक प्रामुख्याने वित्तीय सेवा, ऊर्जा आणि दूरसंचार आधी क्षेत्रांमध्ये झाल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

भारतीय कंपन्यांकडून विदेशात वाढलेल्या गुंतवणुकीमुळेही एफडीआयमध्ये घरसण होत असल्याचे एक कारण आरबीआयने दिले आहे. स्विगी, विशाल मेगामार्ट आणि ह्युंदाई मोटार यासारख्या कंपन्यांमधील गुंतवणुकदारांना मोठा फायदा झाला आहे. ह्युंदाई कंपनीने आपली हिस्सेदारी कमी करून ती 82.5 टक्के केली आणि आयपोतील गुंतवणूक काढली.

Sharp decline in India's FDI inflows
महाराष्ट्रातील ‘या’ ग्रामपंचायतीचा देशात डंका; तुमचं गाव जवळपास तरी आहे का?

भारतीय कंपन्यांनी विदेशात गुंतवणूक वाढविली आहे. मागील आर्थिक वर्षात 29 बिलियन डॉलर एवढी ही गुंतवणूक होती. त्याआधीच्या वर्षी हा आकडा 17 बिलियन डॉलर एवढा होता. भारतीय कंपन्या आता आपला विस्तार जागतिक पातळीवर करत असल्याचे हे चित्र असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या काळात शेअर बाजारात मोठी तेजी राहिली आहे.

Sharp decline in India's FDI inflows
High-Profile Cases in Maharashtra : ...म्हणून घेतली जाते हायप्रोफाइल प्रकरणांची तातडीने दखल, तुमचं-आमचं काय?

भारतीय अर्थव्यवस्था आता परिपक्व होत आहे. परदेशी गुंतवणूकदारांना भारतात सहजपणे गुंतवणूक करण्याची संधी मिळत असून कोणत्या अडचणीशिवाय त्यातून बाहेर पडणे, म्हणजे पैसे काढून घेणेही सोपे होत आहे. भारतीय अर्थव्यवस्था पारदर्शक आणि मजबूत असल्याचे यातून दिसते, असेही तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com