High-Profile Cases in Maharashtra : ...म्हणून घेतली जाते हायप्रोफाइल प्रकरणांची तातडीने दखल, तुमचं-आमचं काय?

Why High-Profile Cases Get Immediate Attention : राजकीय नेते, बडी मंडळी आणि सेलिब्रिटींच्या घरात काय चालले आहे, याची उत्सुकता लोकांना असते. अशा लोकांच्या घरातून अन्याय, अत्याचाराची एखादी घटना समोर आली की त्याविरोधात सोशल मीडियात रान पेटवले जाते.
High Profile Cases
High Profile CasesSarkarnama
Published on
Updated on

Delayed Justice for Common Citizens in Maharashtra : लोकशाहीत सर्वांना न्याय मिळेल, अशी हमी असते. मात्र तसे होते का? याचे उत्तर संमिश्र येईल. न्याय मिळेलच, पोलिस तातडीने दखल घेतीलच, याची शाश्वती नसते. हायप्रोफाइल प्रकरणांमध्ये अशी शाश्वती काही प्रमाणात देता येऊ शकते. अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांच्या वाट्याला काय येत असेल, याची कल्पना न केलेलीच बरी. वैष्णवी हगवणे यांची आत्महत्या आणि त्यानंतरच्या घडामोडींनी अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. हायप्रोफाइला प्रकरणांचा गाजावाजा का होतो, असा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. न्याय सर्वांनाच मिळाला पाहिजे, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही.

मुलगी आणि सून यांच्यात फरक करणे अतिशय चुकीचे, वाईट आहे, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळीच केले आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्येच्या संदर्भातच त्यांनी हे महत्वाचे विधान केले आहे. मुख्यमंत्र्यांचे हे विधान पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करणाऱ्या नेत्यांसह समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायला हवे. शासकीय यंत्रणा, विशेषतः पोलिस यंत्रणेच्या कानातही मुख्यमंत्र्यांचे हे विधान घुमायला हवे. हगवणे कुटुंबाच्या मोठ्या सून मयूरी यांनीही काही दिवसांपूर्वी छळाची तक्रार पोलिसांकडे दिली होती. त्या प्रकरणाची पोलिसांनी योग्य दखल घेतली असती तर वैष्णवी यांचा जीव गेला नसता, असे त्यांचे म्हणणे आहे.

सामान्य लोकांच्या घरात काय होते, महिलांवर कसे आणि किती अत्याचार होतात, हे जाणून घेण्यासाठी समाज फारसा उत्सुक नसतो. सेलिब्रिटींच्या कुटुंबातील महिलांच्या छळाची प्रकरणे समोर आली की समाज कान टवकारून ऐकायला लागतो. मग त्याचा सगळीकडे गवगवा सुरू होतो. अन्य यंत्रणांकडून होणाऱ्या अन्यायाबाबतही अशी परिस्थिती आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात योग्य उपचाराअभावी तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला. तनिषा भिसे यांचे पती एका आमदाराचे स्वीय सहायक असल्यामुळे त्या प्रकरणाचाही मोठा गाजावाजा झाला. तो गाजावाजा होऊ नये, असे नाही पण सामान्य लोकांवर पावलोपवली असे अत्याचार होत असतात, याचाही विसर समाजाला, जबाबदार घटकांना पडायला नको. 

High Profile Cases
Nilesh Chavan News: आधी वैष्णवीच्या कुटुंबियांवर बंदुक रोखली,आता निलेश चव्हाणची दुसरी काळी बाजू समोर; स्पाय कॅमेऱ्यानं पत्नीचेच व्हिडीओ...

गेल्यावर्षी पु्ण्यात एका पोर्शे कारने हिट अँड रन केले होते. यात दोघांचा मृत्यू झाला होता. पोर्शे चालवणारा आरोपी अल्पवयीन होता. त्या प्रकरणाचीही मोठी चर्चा झाली, कारण त्याच्याशी एका आमदाराचा संबंध जोडला होता. संबधित आमदाराने आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला होता. आरोपीच्या रक्ताते नमुने बदलल्याचे समोर आले होते. हिट अँड रनची अनेक प्रकरणे राष्ट्रीय महामार्गांवर घडत असतात. त्याची तितकीशी दखल घेतली जात नाही. अशी बहुतांश प्रकरणे लागलीच विस्मृतीत जातात.

एखादा गुन्हा घडला की त्याचे मूल्य किती आहे, म्हणजे ते कोणाशी संबंधित आहे, याचा शोध समाजमन घेत असते. हगवणे कुटुंबीय सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेशसी संबंधित आहे. राजकीय नेत्यांबद्दल समाजात एक प्रकारची चीडही असते. अशी प्रकरणे समोर आली की लोक आपला राग विविध माध्यमांतून बाहेर काढतात. आता प्रत्येकाच्या हातात सोशल मीडिया आहे. त्या माध्यमातून संबंधित पक्ष, संबंधित नेत्यांवर टीकेचा भडीमार सुरू होतो. समाजाचा हा रेटा राजकीय नेत्यांना, पोलिसांना आणि प्रशासालाही गुडघे टेकायला लावतो. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात हेच झाले आहे. हायप्रोफाइल प्रकरणांचीच तातडीने दखल का घेतली जाते, याचे हे प्रमुख कारण आहे.

High Profile Cases
Vaishnavi Hagwane : वैष्णवीला छळणाऱ्या हगवणे कुटुंबाची हयात तुरुंगातच जाणार! CM फडणवीस ऐतिहासिक निर्णय घेण्याच्या तयारीत

समाज जागा आहे, ही चांगली गोष्ट आहे, मात्र तो हायप्रोफाइल प्रकरणांतच अधिक जागरूकता दाखवतो, तातडीने दाखवतो. सामान्य लोकांच्या प्रकरणांतही समाजाने, यंत्रणेने अशीच जागरूकता दाखवायला हवी. पुण्यातील पोर्शे हिट अँड रन प्रकरण, तनिषा भिसे मृत्यू प्रकरणातही समाजाने सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकार, पोलिस यंत्रणेच्या नाकीनऊ आणले होते. त्यामुळे हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी चंग बांधलेल्या यंत्रणेचे मनसुबे उधळले गेले होते.

आपल्या समाजाची रचना पूर्वापार पुरुषप्रधान अशीच आहे. महिलांना चार भिंतींच्या आड विविध प्रकारच्या छळांचा सामना करावा लागतो. वैष्णवी हगवणे यांना कशा कशा छळाला सामोरे जावे लागले, हे पाहिले की मन हेलावून जाते. राजकीय शक्ती, पैशांच्या बळावर सर्व काही निभावून जाईल, अशा भ्रमात राजकीय नेते. सेलिब्रिटींनी आता अजिबात राहू नये. समाजाचे कान, डोळे अशा लोकांकडे लागलेले असतात. थोडेही खट्ट झाले तर सोशल मीडिया तयारीतच असतो. त्यामुळे हायप्रोफाइल प्रकरणांची तातडीने दखल घेतली जाते. सामान्य लोकांच्या नशिबी असे 'प्रीव्हिलेज' येईल, तो सुदिन म्हणावा लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com