India GDP Growth Rate : भारताच्या विकासदराला ब्रेक? 7.8% वरून 7.1%चा अंदाज

India’s Q1 FY27 GDP growth may slow to 7.1% amid global risks and weak private investment : रॉयटर्सच्या 58 अर्थतज्ज्ञांच्या सर्वेक्षणानुसार एप्रिल-जून तिमाहीत GDP वाढीचा दर 7.1% राहण्याची शक्यता; 31 ऑगस्टच्या अधिकृत आकडेवारीकडे लक्ष, महाग तेलाचा अर्थव्यवस्थेला धोका.
GDP Growth Rate
GDP Growth RateSarkarnama
Published on
Updated on

Indian Economy Growth : देशाच्या आर्थिक विकासाबद्दल बोलताना स्पेशल मिशन, आश्वासने, चर्चा यापेक्षा आकडे काय सांगतात, याला जास्त महत्त्व असते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजे एप्रिल ते जून 2026 या दरम्यान विकासदराला ब्रेक लागल्याचे दिसून येत आहे.

देशाचा जीडीपी वाढीचा दर 7.1 टक्के राहण्याचा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अधिकृत आकडा महिना अखेरीस 31 ऑगस्टला केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडून जाहीर केला जाईल. मात्र रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या सर्वेक्षणानुसार मागील तिमाहीच्या तुलनेत हा विकासदर कमी असण्याची शक्यता आहे.

ग्राहकांनी वस्तू-सेवांवर खर्च करण्यामुळे अर्थव्यवस्थेला आधार मिळाल्याचे दिसते. वस्तू व सेवा करातील (GST) कपात आणि काही करसवलतींमुळे नागरिकांच्या हातात काही प्रमाणात पैसा राहिला. त्यामुळे बाजारातील मागणी टिकून राहण्यासाठी त्याची मदत झाली. जीएसटी कपातीमुळे महागाईचा प्रभाव काही प्रमाणात कमी झाला. या काही सकारात्मक बाबींमुळे विकासदर सावरल्याचे चित्र निर्माण झाले असले तरी खासगी गुंतवणुकीचा वेग अपेक्षेप्रमाणे वाढलेला नाही, ही चिंतेची बाब असल्याचे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

महाग तेल आणि जागतिक परिस्थितीचा धोका अशी मोठी आव्हाने भारताच्या अर्थव्यवस्थेसमोर (Economy) आहेत. आशियातील तिसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या अर्थव्यवस्थेसाठी मध्यपूर्वेतील संघर्ष आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती चिंतेचा विषय आहेत.

GDP Growth Rate
OBC Certificate Invalid : राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराकडून ‘राजकीय विकेट’; ओबीसी जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने पद रद्द

कच्च्या तेलाच्या किंमतीचा परिणाम

विशेषतः कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 90 डॉलरच्या पुढे गेल्यास भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. याशिवाय अमेरिका-इराण युद्धाची अनिश्चितता आणि उत्पादन खर्चात होणारी वाढ यामुळे कंपन्यांच्या नव्या गुंतवणुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

GDP Growth Rate
Narhari Zirwal statement : आदिवासी विद्यार्थी 14 दिवसांपासून आंदोलनात; झिरवळांच्या ‘नंबर’ वक्तव्याने चर्चेला उधाण

विकासदर कमी होण्याची शक्यता

रॉयटर्सने 17 ते 24 ऑगस्टदरम्यान 58 अर्थतज्ज्ञांचे सर्वेक्षण केले. त्यानुसार, एप्रिल-जून तिमाहीत भारताचा जीडीपी वाढीचा दर सुमारे 7.1 टक्के राहण्याचा अंदाज आहे. तर याआधीच्या तिमाहीत भारताचा जीडीपी वाढीचा दर 7.8 टक्के नोंदवण्यात आला होता. त्यानुसार आता झालेली घसरण पाहता आगामी आकडेवारीत विकासदर काहीसा कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अर्थतज्ज्ञांचा सल्ला

31 ऑगस्टला जाहीर होणाऱ्या अधिकृत आकडेवारीकडे आता अर्थतज्ज्ञ आणि बाजाराचे लक्ष लागले आहे. या आकडेवारीत जीडीपी वाढीचा दर किमान 6.2 टक्के ते जास्तीत जास्त 8 टक्क्यांदरम्यान राहू शकतो, असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com