INDIA Maharally : निवडणुकीत भाजपकडून मॅचफिक्सिंग; राहुल गांधींचा गंभीर आरोप

Rahul Gandhi News : दिल्लीमधील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची महारॅली झाली. या महारॅलीमध्ये इंडीया आघाडीतील नेत्यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. राहुल गांधी म्हणाले, भाजपला निष्पक्ष निवडणूक होऊ द्यायची नाही.
INDIA Maharally
INDIA Maharally Sarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : देशाचे संविधान धोक्यात आहे. भाजपचा एक नेता संविधान बदलण्याची भाषा करतोय. निवडणुकीच्या आधी दोन राज्यातील मुख्यमंत्र्यांना अटक केली जाते. मॅचफिक्सिंग करत भाजपला, मोदींना निवडणूक जिंकायची आहे, असा घणाघात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर केला.

दिल्लीमधील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची महारॅली (INDIA Maharally) झाली. या महारॅलीमध्ये इंडीया आघाडीतील नेत्यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. राहुल गांधी म्हणाले, भाजपला निष्पक्ष निवडणूक होऊ द्यायची नाही. त्यामुळेच निवडणुकीच्या आधी काँग्रेसची (Congress) बँक खाती गोठवली. दोन राज्यातील मुख्यमंत्र्यांना अटक केले. ही कारवाई निवडणुकीच्या सहा महिने आधी किंवा सहा महिने नंतर केली अ्सती तर त्यांच्या हेतुवर शंका घेतली नसती. मात्र निवडणुकीच्या तोंडवार कारवाई करून भाजप मॅचफिक्सिंग करत आहे.

INDIA Maharally
India Alliance Rally : गजाआड असलेल्या केजरीवालांची गॅरंटी; महारॅलीत सहा मोठ्या घोषणा...

भाजपचा 400 पारचा नारा देत आहे. मात्र ईव्हीएम नसेल तर भाजप 180 देखील पार होणार नाहीत. निवडणुकीतील मॅचफिक्सिंग ही देशाचे संविधान बदलण्यासाठी केली जात आहे. ज्या दिवशी संविधात बदलण्यात येईल त्या दिवशी देश वाचणार नाही,असा इशारा राहुल गांधींनी दिला.

भाजपचा लोकशाहीव हल्ला

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार भाजपवर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्री अरविंज केजरीवाल, आणि हेमंत सोरेन यांची अटक हा संविधानावर हल्ला आहे. मुख्यमंत्र्यांना अटक ही ही कारवाई लोकशाहीवर हल्ला आहे, असा टीका शरद पवारांनी मोदी सरकारवर केली .

उद्धव ठाकरेंनी घेतला भाजपचा समाचार

उद्धव ठाकरेंनी आपल्या ठाकरे शैलीत नरेंद्र मोदींचा समाचार घेतला. भाजप ईडी, सीबीआय, आयटी डिपार्टमेंटचा वापर करून निवडणूक जिंकत आहे. जर हिंमत असेल तर तुमच्या बॅनरवर लिहा की, ईडी, सीबीआय, आयटी डिपार्टमेंट भाजपच्या तीन साथी पक्ष आहेत, असे आव्हान ठाकरेंनी भाजपला दिले.

एकत्र येऊन भाजपला पराभूत करू

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लोक लढले. लोकशाही वाचवण्यासाठी बीजेपीच्या विरोधात इंडीया आघाडीला लढायचे आहे.देशातील लोक ठरवतील त्यांना हुकुमशाही हवी की लोकशाही.

भाजप 400 जागांवर पराभूत होणार

लोकांनी निवडून दिलेल्या दोन मुख्यमंत्र्यांना भाजपने तुरुंगात टाकले. लोक भाजपची थू-थू करत आहेत. भाजपचा दहा वर्षांचा कार्यकाळ पाहिला तर भाजप 400 जागा जिंकत नाही तर 400 जागांवर पराभूत आहे.

INDIA Maharally
Uddhav Thackeray News : "तुमच्या जाण्यायेण्याचा अन् हॉटेलचा खर्च मी करतो, फक्त...", ठाकरेंचं फडणवीसांना थेट आव्हान

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com